Jonty Rhodes: फ्लाइट दीड तास लेट मग तुटलेली सीट, जॉन्टी ऱ्होड्सचा संताप, म्हणाला..

Jonty Rhodes Air India Flight: गळकं छत, तुटलेल्या सीट एसटीत असा अनुभव आतापर्यंत अनेकांना आलाय. मात्र विमानतही परिस्थिती काही वेगळी नाही. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक असलेल्या जॉन्टी ऱ्होड्स यांना विमानात तुटलेली सीट मिळाली. त्यावरुन ऱ्होड्स यांनी संताप व्यक्त केलाय.

Jonty Rhodes: फ्लाइट दीड तास लेट मग तुटलेली सीट, जॉन्टी ऱ्होड्सचा संताप, म्हणाला..
Jonty Rhodes Air India Flight
| Updated on: Sep 01, 2024 | 4:22 PM

दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक असलेले जॉन्टी ऱ्होड्स यांनी सोशल मीडियावर त्यांना प्रवासात आलेला वाईट अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ऱ्होड्स यांना विमानतळावर फ्लाइट उशिराने असल्याने विनाकारण दीड तास वाट पाहावी लागली. त्यानंतर त्यांना विमानात तुटकी सीट मिळाली. त्यामुळे ऱ्होड्स यांच्या संयमाचा बांध फुटला. ऱ्होड्स यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. ऱ्होड्स यांनी या पोस्टमधून झालेला सर्व प्रकार आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवला.

ऱ्होड्स यांची एक्स पोस्ट

ऱ्होड्स यांनी एअर इंडियाला त्यांना मिळालेल्या वाईट अनुभवामुळे चांगलंच झापलं. “विमान प्रवासादरम्यान माझं दुर्देवाची मालिका सुरुच आहे. मला मुंबईवरुन दिल्लीला जायचं होतं. मात्र फ्लाइटने दीड तास उशीराने उड्डाण घेतलं. इतकंच नाही, मी तुटलेल्या सीटचा स्वीकार करतो, असा उल्लेख असलेल्या एका पत्रावर मी आता सही केलीय. माझ्या सोबतचं असं का?”, अशा शब्दात ऱ्होड्स यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

ऱ्होड्स यांनी एअर इंडियाची फिरकीही घेतली. माझा पुढील 36 तासांत दिल्लीवरुन मुंबईला जाण्याचं नियोजन नाही. मी थेट केपटाऊनला जाणार आहे, असंही ऱ्होड्स यांनी पोस्टमध्ये नमूद केलंय. जॉन्टी ऱ्होड्स यांच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एअर इंडियाने आपल्या सेवेत सुधारणा करायला हवी, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

जॉन्टी ऱ्होड्स यांची पोस्ट आणि एअर इंडियाचा माफीनामा

एअर इंडियाकडून माफी

जॉन्टी ऱ्होड्स यांनी संताप व्यक्त केल्यानंतर एअर इंडियाने अखेर जाही माफी मागितलीय. ऱ्होड्स यांच्या एक्स पोस्टला उत्तर देत एअर इंडियाने खेद व्यक्त केलाय. “सर, तुम्हाला वाईट अनुभव आला यासाठी आम्ही दिलगीर आहोत. तुमच्यासोबत जे झालं त्याची आम्ही चौकशी करु”, असं एअर इंडियाने म्हटलंय.