टॉपर्स कॉर्नर
IIT, NEET, CA आदी परीक्षेत ज्यांनी अव्वल क्रमांक मिळवला आहे किंवा अत्यंत हालअपेष्टातून ज्यांनी या परीक्षा क्रॅक केल्या आहेत, अशा लोकांची कहाणी सांगण्यासाठी हे पेज क्रिएट करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांकडून IIT, NEET, CA आदी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौलिक मार्गदर्शन मिळावं, परीक्षेची तयारी कशी केली पाहिजे? कोणती पुस्तकं वाचली पाहिजे? क्लास लावावा की लावू नये? किती तास अभ्यास केला पाहिजे? सोशल मीडियात असावं की असू नये? भाषेवर प्रभूत्त्व कसं मिळवावं? कठीण वाटणारे विषय सोपे कसे करावे? आदी विषयांचं नॉलेज विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून हा टॉपर्स कॉर्नर तयार करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांनी यश कसं मिळवलं? त्यांनी यशाचं रहस्य कसं शोधलं? हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? इथे तुम्हाला त्यांच्या शिफारस केलेल्या पुस्तकांची, ऑनलाइन टूल्स आणि पुनरावलोकन तंत्रांची देखील माहिती मिळेल. या पेजवर टॉपर्सची सखोल प्रोफाइल, रँक माहिती आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास पाहता येईल. हा प्लॅटफॉर्म फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालक आणि शिक्षक देखील हा मजकूर वाचून विद्यार्थ्यांसाठी योग्य वातावरण तयार करण्याची कला शिकू शकतात.
MP PCS Success Story : बाप रिक्षा चालवायचा, पोरगी आता जिल्हा चालवणार; कसा आहे आयशाचा डेप्युटी कलेक्टरपर्यंतचा प्रवास?
रिक्षा चालक वडिलांची मुलगी आयशा अन्सारीने कठोर परिश्रमाने 2022 च्या MPPSC परीक्षेत यश मिळवले आहे. ती आता डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करेल. तिच्या यशामागे आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि तिचा अथक अभ्यास आहे. आयशाच्या यशाचा तिच्या कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर अभिमान आहे.
- निर्मिती तुषार रसाळ
- Updated on: Jan 20, 2025
- 4:45 pm
भाजी विकणाऱ्याचा मुलगा, MPPSC च्या पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी
मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत भाजी विक्रेत्याचा मुलगा अधिकारी झाला आहे. भोपाळ येथील रहिवासी असलेल्या आशिष सिंह चौहानला लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत 841 गुण मिळाले असून त्याला शिक्षण विभागात सहाय्यक संचालक पद मिळाले आहे.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Jan 19, 2025
- 3:39 pm
वडिलांकडून मिळाली प्रेरणा, किंजल अजमेरानं घेतली भरारी, CA परीक्षेत भारतात तिसरी
किंजल अजमेराने सीए फायनल परीक्षा 2024 मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिने आठवीत ठरवले होते की सीए व्हायचं आहे. तिचे वडीलही सीए आहेत. वडिलांना पाहून प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Jan 16, 2025
- 9:42 pm
सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूनम श्योरानने दिला मोलाचा सल्ला, सीएची तयारी करताना नेहमी रहा सकारात्मक
सीए फायनल परीक्षेचा निकाल डिसेंबर 2024 मध्ये जाहीर झाला आहे. यामध्ये पूनम श्योरानने पूर्ण भारतामधून चौथा क्रमांक मिळवला आहे. तिने सांगितलं आहे की ती सहा महिने दररोज आठ ते दहा तास अभ्यास करायची. यानंतर ती स्वतःला फ्रेश करण्यासाठी काही चित्रपट बघायची. आता पुढे तिला एमबीए करण्याची इच्छा आहे.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Jan 16, 2025
- 5:22 pm
महाराष्ट्रातील रहिवाशी सिंघम IPS यांचा राजीनामा अखेर केंद्राकडून मंजूर, IPS पुढे काय करणार?
IPS Shivdeep Lande News: शिवदीप वामनराव लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आपल्या पगारातील ६० ते ७०% रक्कम गरीब मुलींचे सामूहिक विवाह आणि अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि वसतिगृह चालवणाऱ्या संस्थेला दान करत असतात.
- Jitendra Zavar
- Updated on: Jan 16, 2025
- 2:35 pm