प्रेमाची अशी अनोखी कबुली, हेलिकॉप्टरसमोरच पायलटचा गर्लफ्रेंडला प्रपोज, video viral

तुम्ही प्रियकराने प्रेयसीला प्रपोज करण्याचे अनेक प्रकार पाहिले असतील, परतू एका सैन्य पायलटने हेलिकॉप्टरसमोरच त्याच्या गर्लफ्रेंडला केलेल्या अनोख्या प्रपोजचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

प्रेमाची अशी अनोखी कबुली, हेलिकॉप्टरसमोरच पायलटचा गर्लफ्रेंडला प्रपोज, video viral
Helicopter Proposes video
| Updated on: Jun 02, 2026 | 9:32 PM

प्रेयसीला प्रपोज करताना प्रेमाची कबुल देण्याच्या नारा तऱ्हा सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात व्हायरल होत आहेत. आपला एक गुडघा जमीनीवर टेकवत प्रेयसीला रिंग गिफ्ट करताना अनेक प्रेमवीर तुम्ही पाहिले असतील. मात्र, महाराष्ट्रातील नाशिक येथे आयोजित एका सैन्य पायलट ग्रॅज्युएशन समारंभ खास झाला जेव्हा एका युवा सैन्य अधिकाऱ्याने आपले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लागलीच त्याचा गर्लफ्रेंडला सर्वासमोर प्रपोज केले. या भावूक क्षणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि युजर त्यावर रिएक्ट होत आहेत.

हा खास क्षण नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल ( CAATS ) मध्ये पाहायला मिळाला आहे. जेथे आर्मी एव्हीएशनचे ट्रेनी पायलट आपले खडतर आणि दीर्घ प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएशन समारंभात सामील झाले होते. समारंभात सैन्य शिस्त, प्रशिक्षणातून मिळालेला नवे शिक्षण आणि नव्या पायलट्सना या परीक्षेत मिळालेल्या यशाला सेलिब्रेट केले जात होते., परंतू एका युवा अधिकाऱ्याने त्याच्या खाजगी जीवनाच्या क्षणांना येथे आणखीनच सुंदर आणि कायम लक्षात राहातील असे बनवले.

व्हिडीओत स्पष्ट दिसते की भारत भारद्वाज नावाचा सैन्य अधिकाऱ्याने नुकतेच सैन्य पायलट ट्रेनिंग पूर्ण केले आहे.त्याने त्याची गर्लफ्रेंड आरुषी हीला समारंभ स्थळावर उभ्या असलेल्या एका हेलिकॉप्टर जवळ नेले. तेथे उपस्थित कुटुंबाचे सदस्य, दोस्त, अन्य अधिकारी आणि पाहुणे त्यांच्या कडे पाहात होते. भारत भारद्वाज हेलिकॉप्टर जवळ त्याच्या प्रेयसीच्या जवळ एक गुडघा टेकवून बसला आणि त्याने सर्वांसमक्ष आरुषी हिला अंगठी देत प्रपोज केले. हा नजारा पाहून तेथे उपस्थित सर्वजण हैराण झाले. काही क्षणातच आसपास असणारे सर्व जण तेथे एकत्र आले.

जे हेलिकॉप्टर त्यांच्या वर्षांच्या मेहनत, प्रशिक्षण आणि सैन्य करिअरची नवी सुरुवातीचे प्रतीक बनून उभे होते.त्याच्यासमोर त्याने आपल्या जीवनातील एका मोठा निर्णय घेत नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या प्रकारे त्याचा पेशा आणि खाजगी जीवन असा दोन महत्वाचे क्षण एकाच व्यासपीठावर जुळून आले.

भारत भारद्वाज याची प्रेयसी आरुषी हीने देखील हसत आणि लाजत हे प्रपोजल सर्वांसमक्ष स्वीकारले. त्यावेळी सभोवताली उभ्या असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजून त्यांच्या आनंदाला द्वीगुणित केले. काही क्षण आधी लोक नव्या सैन्य पायलटच्या यशाचा जश्न करत होते. तेच आता या सुंदर क्षणाचे देखील साक्षीदार झाले.

येथे पोस्ट पाहा –

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी यास देशसेवा,प्रशिक्षणाचे यश आणि प्रेम यांचा अनोखा संगम म्हटले. अनेक युजर्सने म्हटले की पायलट झाल्यानंतर त्याच वेळी जीवनसंगिनीला प्रपोज करणे हे त्यांच्या जीवनाच्या दोन नव्या प्रवासाच्या प्रारंभासारखे आहे. अनेक लोकांना या अविस्मरणीय आणि विशेष प्रपोजलचे कौतूक केले आहे.

 

Follow Us