Santosh Bangar : संतोष बांगर यांना कायदा लागू आहे? मतदान केंद्रातच नियम मोडले, मोबाईल आणला शूट केलं अन्…
हिंगोलीतील नगरपालिका मतदानादरम्यान आमदार संतोष बांगर यांनी नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप आहे. त्यांनी मोबाईलने मतदान चित्रीकरण केले, गोपनीयतेचा भंग केला आणि मतदारांना सूचनाही दिल्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकप्रतिनिधींनी लोकशाहीचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे.
हिंगोली येथील नगरपालिका निवडणुकीत मतदान करताना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. बांगर यांनी मतदान केंद्रात मतदानाची गोपनीयता भंग केली. त्यांनी मोबाईलने स्वतःच्या मतदानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, तसेच केंद्रात घोषणाबाजी केली. याशिवाय, त्यांनी मतदारांना कोणते बटण दाबायचे याबाबत सूचनाही दिल्या. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असतानाही त्यांनी तो सोबत ठेवला आणि थेट मतदान केंद्रात प्रवेश केला. या कृतीमुळे निवडणूक आयोगाला आव्हान दिल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे असे म्हटले आहे. बांगर यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, हिंगोलीच्या जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

