Badlapur | बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन

Badlapur | बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन

| Updated on: May 08, 2026 | 12:43 PM

बदलापूरच्या घटनेची मुंबईतल्या गोवंडीमध्ये पुनरावृत्ती झाली आहे, गोवंडी मधील नामांकित शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोवंडीतील एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या 45 वर्षीय शिपायाने 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बदलापूरच्या घटनेची मुंबईतल्या गोवंडीमध्ये पुनरावृत्ती झाली आहे, गोवंडी मधील नामांकित शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोवंडीतील एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या 45 वर्षीय शिपायाने 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन करत होता. संबंधित विद्यार्थी शाळेत असताना आरोपी त्याला शाळेतील रिकाम्या खोलीत नेऊन गैरवर्तन करत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्याने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. त्यानंतर पालकांनी तातडीने गोवंडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपी राजेश महाकाळ याच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, गोवंडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

Published on: May 08, 2026 12:41 PM
Follow Us