फ्रेंच कंपनी सिट्रॉएनची eC3 इव्ही भारतात लाँच, जाणून घ्या रेंज, किंमत आणि इतर फीचर्स

| Updated on: Feb 27, 2023 | 4:05 PM

सिट्रॉएन कंपनीनं आपली गाडी चार व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे. यात लाईव्ह, फील, फील व्हाईब पॅक आणि फील ड्युअल टोन व्हाईब बॅक या व्हेरियंटचा समावेश आहे. या गाड्यांच्या टॉप व्हेरियंटची किंमत 12.43 लाख (एक्स शोरुम) पासून सुरु होते.

फ्रेंच कंपनी सिट्रॉएनची eC3 इव्ही भारतात लाँच, जाणून घ्या रेंज, किंमत आणि इतर फीचर्स
सिट्रॉएन eC3 इव्ही भारतात लाँच झाल्यानंतर एकच चर्चा, इतकी असेल खास
Follow us on

मुंबई : फ्रेंच कार निर्मात कंपनी सिट्रॉएननं आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लाँच केली आहे.सिट्रॉएन eC3 या वर्षीच्या सुरुवातीला सादर करण्यात आली होती. या गाडीची सुरुवातीची किंमत 11.50 लाख (एक्स शोरुम) इतकी आहे. सिट्रॉएन कंपनीनं आपली गाडी चार व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे. यात लाईव्ह, फील, फील व्हाईब पॅक आणि फील ड्युअल टोन व्हाईब बॅक या व्हेरियंटचा समावेश आहे. या गाड्यांच्या टॉप व्हेरियंटची किंमत 12.43 लाख (एक्स शोरुम) पासून सुरु होते. या गाडीची डिलिव्हरी पुढच्या काही दिवसात सुरु होईल असं सांगण्यात येत आहे.सिट्रॉएन eC3 ही इलेक्ट्रिक कारशी भारतीय बाजारात स्पर्धा करेल. खासकरुन सिट्रॉएन eC3 ची स्पर्धा टाटा टिगोर इव्हीशी असणार आहे. तसं पाहिलं तर सिट्रॉएन eC3 ही टाटा टियागो इव्हीपेक्षा थोडी महाग आहे. टाटा टियागो इव्हीचं टॉप मॉडेल 12 लाखापर्यंत मिळतं.

सिट्रॉएन eC3 मध्य 29.3 किलोवॅट बॅटरी पॅक आहे. यामुळे गाडी 320 किमीपर्यंत सिंगल चार्जवर रेंज देते.ही इलेक्ट्रिक मोटर 57 पीएस पीक पॉवर आणि 143 एनएम जास्तीत जास्त टॉर्क जनरेट करते. सिट्रॉएन eC3 6.8 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास इतका वेग धरते. या गाडीचा टॉप स्पीड 107 किमी प्रतितास इतका आहे. या गाडीतील बॅटरी पॅक डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे 57 मिनिटात बॅटरी 10 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. 15Aपॉवर सॉकेट 10 ते 100 टक्के चार्जिंगसाठी 10.5 तास घेते.

सिट्रॉएन eC3 व्हेरियंट आणि त्याची किंमत

सिट्रॉएन eC3 चं डिझाईन स्टँडर्स C3 मॉडेलपेक्षा वेगळं आहे. नावाच्या सुरुवातीलाच e अल्फाबेट लागल्याने इलेक्ट्रिक व्हेईकल असल्याचं अधोरेखित होतं. या गाडीचं आकारमान आयसीई वर्झन सारखंच आहे. सिट्रॉएन eC3 लाईव्हची एक्स शोरुम किंमत 11.50 लाख इतकी आहे. तर सिट्रॉएन eC3 फीलची किंमत 12.13 लाख, सिट्रॉएन eC3 फील व्हाईब पॅकची किंमत 12.28 लाख, सिट्रॉन eC3 फील ड्युअल टोन व्हाईब पॅकची किंमत 12.43 लाख इतकी आहे.

सिट्रॉएन eC3 चं इंटेरियर सी3 वर्झन सारखंच आहे. पण यात थोडेफार बदल करण्यात आले आहेत. स्टियरिंग व्हिलमध्ये तीन स्पोक फ्लाट बॉटम मल्टिफंक्शनसह आहे. इन्फोटेंनमेंटसाठी 10.25 इंचाचा टचस्क्रिन असून वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. या इन्फोटेंनमेंट सिस्टमध्ये यासह आणखी 35 कनेक्टेड कार फीचर्सदेखील आहेत.

कंपनीचे सीईओ आणि एमडी रोलँड यांनी सांगितलं की,सिट्रॉएन eC3 ऑल इलेक्ट्रिक गाडी भारतात नक्कीच चांगली कामगिरी करेल. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये या गाडीची जोरदार चर्चा रंगली आहे. कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, सिट्रॉएन eC3 गाडी देशातील 25 शहरांमध्ये उपलब्ध केली जाईल. त्याचबरोबर 298 शोरुममधून बूक केली जाऊ शकते. शहरातील बी2सी ग्राहकांना कंपनी थेट त्यांच्या घरी डिलिव्हरी सुविधा देईल.