Air Taxi : टॅक्सी करा बुक अन् उडा की हवेत! भारतीय स्टॉर्टअपची कमाल

| Updated on: Feb 19, 2023 | 11:16 AM

Air Taxi : देशात आता वेगवान आणि जलद वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला. भारतीय स्टार्टअप कंपनीने हा भन्नाट फ्लाईंग टॅक्सी तयार केली आहे. विशेष म्हणजे ही इलेक्ट्रिक फ्लाईंग टॅक्सी आहे. ही हेलिकॉप्टरपेक्षाही वेगाने उडते. बेंगळुरू येथील एरो इंडिया शोमध्ये फ्लाइंग टॅक्सीने सर्वांचेच लक्ष वेधले.

Air Taxi : टॅक्सी करा बुक अन् उडा की हवेत! भारतीय स्टॉर्टअपची कमाल
Follow us on

नवी दिल्ली : देशात आता वेगवान आणि जलद वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला. भारतीय स्टार्टअप कंपनीने (Indian Startup Company) हा भन्नाट फ्लाईंग टॅक्सी तयार केली आहे. विशेष म्हणजे ही इलेक्ट्रिक फ्लाईंग टॅक्सी (Flying Taxi) आहे. ही हेलिकॉप्टरपेक्षाही वेगाने उडते. चेन्नई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने त्यासाठी सर्व पाठबळ पुरविले आहे. या उडत्या टॅक्सीमुळे तुम्ही हेलिकॉप्टरपेक्षाही (Helicopter) अधिक वेगाने प्रवास करु शकता. प्रवासी वाहतुकीसाठी ही एक मोठी क्रांती ठरणार आहे. मुंबई लगत पाण्यावर चालणारी टॅक्सी मुंबईकरांचा वेळ वाचविण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. तसाच आता हवेतून उडणाऱ्या या टॅक्सीमुळे भविष्यात हवेतून उडण्याचा आनंद घेता येईल. विशेष म्हणजे ही टॅक्सी प्रदुषणरहीत असेल. बेंगळुरू येथील एरो इंडिया शोमध्ये फ्लाइंग टॅक्सीने सर्वांचे लक्ष वेधले होते.

सध्या अनेक मोठ्या शहरात ट्रॅफिक जाम नित्याचेच झाले आहे. कोणत्याही चौकात, सिग्नलवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. लोक ट्रॅफिकमुळे जाम वैतागलेले आहेत. त्यातच रस्त्याचे रुंदीकरण, उड्डाणपूलाचे काम, नवीन रस्त्याचे काम यामुळे तर या समस्येत आणखी भर पडते. या झंझटीतून बाहेर पडण्यासाठी इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी विकसित करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

प्रोटोटाइप हे इलेक्ट्रिक वर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग (eVOTL) मॉडेल आहे. एकदा ही फ्लाईक टॅक्सी चार्ज केली तर ती 200 किमी उडते. जमिनीवरील रस्त्यांपेक्षा हवेतील अंतर वेगळे असते आणि इच्छितस्थळी लवकर पोहचता येते. त्यामुळे फ्युचरेस्टिक फ्लाईंग कारमुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी कारपेक्षा 10 पट वेगाने प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी म्हणजे प्रवासाच्या ठिकाणी सोडेल, असा दावा स्टार्टअपने केला आहे. साधारणपणे समान अंतरासाठी Uber जेवढे शुल्क आकारेल. त्याच्या दुप्पट या हवाई राईडासाठी किंमत मोजावी लागेल.

ही इलेक्ट्रिक फ्लाईंग टॅक्सी तयार करण्याची आयडियाची कल्पना सुचण्यामागेही रोचक कथा आहे. इलेक्ट्रिक ग्राउंड ट्रान्सपोर्टेशनवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी बनवण्याची कल्पना आली. विमानाचे सीईओ प्रांजल मेहता आणि स्टार्टअपचे सीटीओ प्रोफेसर सत्य चक्रवर्ती यांनी याविषयीची माहिती दिली.

विशेष म्हणजे या फ्लाइंग टॅक्सीला उतरण्यासाठी जास्त जागा लागत नाही. पार्किंगसाठी 25 चौरस मीटर जागा अगदी पुरेशी आहे. या फ्लाईंग कारचे वजन 200 किलो आहे, चार डक्टेड पंखे त्याचे प्रोपेलर म्हणून काम पाहतील. या टॅक्सीमध्ये दोन प्रवासी बसू शकतात आणि 150 किमी प्रतितास ते 200 किमी प्रतितास या वेगाने प्रवास करू शकतात.

समुद्रसपाटीपासून फ्लाइंग टॅक्सी 457 मीटर (1,500 फूट) उंचीवरुन उडेल. या फ्लाईंग टॅक्सीची बॅटरी तुम्हाला बदलविता येत नाही. कंपनीने या बॅटरीबद्दल, तिच्या चार्जिंगबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. याविषयीची माहिती अधिकृतपणे समोर आलेली नाही.

आता आणखी एक जोरदार वैशिष्ट्य पाहा. ही टॅक्सी एखाद्या घराच्या छतावरुन दुसऱ्या घराच्या छतावर उतरविता येईल. पण त्यासाठी अर्थातच मोठे घर लागेल. शहरी एअर मोबिलिटीसाठी ही फ्लाईंग कार योग्य असल्याचा दावा स्टार्टअपने केला आहे.

ePlane कंपनीने टॅक्सीचे हे मॉडेल विकसित करण्यासाठी जवळपास $1 दशलक्ष जमा केले आहे. सध्या ही फ्लाइंग टॅक्सी उडविण्यासाठी पायलटची आवश्यकता आहे. भविष्यात स्वायत्त तंत्रज्ञानाद्वारे ही टॅक्सी हवेत उडेल. 2017 मध्ये ही स्टार्टअप कंपनी स्थापन झाली होती.