AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हँडसम रिलस्टारचा धक्कादायक कांड, पोरींना मधाळ बोलून…घरात सापडल्या हादरवणाऱ्या वस्तू!

एक मिलियनपेक्षा जास्त पॉलोअर्स असणाऱ्या एका रिलस्टारने एका तरुणीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याआधीही त्याने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

हँडसम रिलस्टारचा धक्कादायक कांड, पोरींना मधाळ बोलून...घरात सापडल्या हादरवणाऱ्या वस्तू!
dombivali reel star scam (आरोपी पोलिसांच्या अटकेत, महिलेचा सांकेतिक फोटो)Image Credit source: tv9 marathi, meta ai
| Updated on: Nov 15, 2025 | 3:41 PM
Share

Reel Star Detained : प्रसिद्ध रील स्टार आणि मॉडेलिंगच्या दुनियेत लाखोंनी फॉलोअर्स असलेला शैलेश रामगुडे याच्यावर विष्णूनगर पोलिसांनी फसवणुकीच्या गंभीर आरोपाखाली अटकेटी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर मैत्री आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून उच्चशिक्षित आणि मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या अनेक तरुणींना त्याने लाखोंचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. डोंबिवलीतील एका तरुणीशी मैत्री करून त्याने तिची सव्वा किलो सोनं आणि रोख 51 लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शैलेश रामगुडे याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून 37 तोळे सोने, एक बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन असा एकूण एक ते दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार शैलेश प्रकाश रामगुडे हा ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहतो. ते लोकप्रिय ‘रील स्टार’ आहे. विशेष म्हणजे मॉडेलिंगिच्या दुनियेतही त्याचे मोठे नाव आहे. त्याने इन्स्टाग्रामवर 1 मिलियन हून अधिक फॉलोअर्स आहेत. तो इन्स्टाग्रामवर तरुणींसोबत ओळख करायचा. एकदा ओळख झाली की तरुणींसोबत ‘मैत्री’ आणि ‘प्रेमाचे’ नाटक करायचा. विश्वास संपादन झाल्यावर या तरुणींना तो लग्नाचे किंवा इतर आमिष दाखवून ‘भूलथापा’ द्यायचा. मुलीचा विश्वास संपादन झाल्यावर तो त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोठी रक्कम उकळायचा. या फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणी उच्चशिक्षित असून मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशाच प्रकारे डोंबिवलीतील एका तरुणीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

या तक्रारीत आरोपीने तक्रारदार तरुणीशी मैत्री करून तिची सव्वा किलो सोनं आणि रोख 51 लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केली. या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शैलेश रामगुडे याला बेड्या ठोकत ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून 37 तोळे सोने, एक बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन असा एकूण एक ते दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे आरोपी शैलेश रामगुडे याच्यावर यापूर्वीही ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्थानकात दोन गुन्हे दाखल आहेत. यातील एका गुन्ह्यात 43 लाख रुपये आणि दुसऱ्या गुन्ह्यात 29 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार आहे. या दोन्ही तक्रारी दोन वेगवेगळ्या तरुणींनीच केलेल्या आहेत.

फसवणूक झाल्यास समोर येण्याचे आवाहन

दरम्यान, सध्या हा आरोपी विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून या आरोपीने आणखी काही तरुणींची फसवणूक केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी इतर फसवणूक झालेल्या तरुणींनाही न घाबरता संबंधित पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ऑनलाईन मंचावर कोणाशीही मैत्री करण्याआधी योग्य ती खबरदारी घ्या, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.