
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान केवळ भारताचे नाही, तर संपूर्ण जगभरात सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जात. परदेशातही शाहरुख खानची तुफान क्रेझ पाहायला मिळते. अरब देशांमध्ये लोक त्याच्या चित्रपटांचे दीवाने आहेत. आता शाहरुखने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे की लोक त्याला किती पसंत करतात. सुपरस्टारच्या नावाने एक भव्य टॉवर बांधला जाणार आहे, ज्याची किंमत अब्जावधी रुपयांपेक्षा जास्त आहे.
शुक्रवारी मुंबईत एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला शाहरुख खान उपस्थित होता. या कार्यक्रमात त्याने त्याच्या नावाची इमारत ‘शाहरुख होम डेन्यूब’चे उद्घाटन केले. त्याच्यासोबत या इमारतीचे संस्थापक आणि चेअरमन रिझवान साजनही उपस्थित होते, ज्यांनी सुपरस्टारच्या नावाने ही भव्य इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. ही इमारत दुबईत उभारण्यात आली आहे. तसेच या 56 मजली इमारतीची किंमत जवळपास 4000 कोटींपेक्षा जास्त आहे.
कुठे आहे ही इमारत?
दुबईत शाहरुखची लोकप्रियता खूप जास्त आहे. तेथील जनता त्याच्यावर प्रचंड प्रेम करते. आता त्याच्या नावाने बांधल्या जाणाऱ्या या इमारतीबाबत सुपरस्टारनेही आनंद व्यक्त केला. त्याने कार्यक्रमात म्हटले, ‘जर माझी आई आज जिवंत असती, तर ती खूप आनंदी झाली असती. हा खूप मोठा सन्मान आहे. जेव्हा माझी मुले येतील, तेव्हा मी त्यांना सांगेन की पाहा, पप्पांचे नाव बिल्डींगवर लिहिलेले आहे. ही पप्पांची इमारत आहे.’
शाहरुखला आली आईची आठवण
शाहरुखने पुढे त्याच्या नावाने बांधल्या जाणाऱ्या इमारतीबाबत म्हटले, ‘मी स्वतःला कधीही अशा स्थितीत पाहिले नव्हते. पण रिझवान भाईंनी मला त्यांच्या पत्नीबद्दल सांगितले. त्या खूप आजारी आहेत आणि इन्शाअल्लाह त्या लवकरच बऱ्या होतील. ही गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्श करणारी ठरली. प्रथमच, मी आदिलचा प्रस्ताव मान्य करून या कल्पनेला होकार दिला. त्यांच्या टीमची एक साधी कल्पना होती. खूप लोक मोठ्या शहरांमध्ये घरी येतात. त्यांचे स्वप्न व्यवसाय आणि घर बांधणे असते. जर मी याचा भाग बनू शकलो आणि प्रेरणा बनू शकलो, तर हे माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असेल.’
काय आहे बिल्डींगची खासियत?
शाहरुखच्या नावाने बांधली जाणारी इमारत ‘शाहरुख होम डेन्यूब’ हा एक व्यावसायिक टॉवर आहे. हा टॉवरचे काम २०२९ पर्यंत पूर्ण होईल. या मालमत्तेची किंमत 4000 कोटी रुपयांपर्यंत सांगितली जात आहे. हा टॉवर 56 मजली असेल. कोणत्याही मुस्लिम देशात प्रथमच अभिनेत्याची मूर्ती उभारली जाणे हे स्वतःच एक ऐतिहासिक पाऊल आहे. तसेच टॉवरमध्ये एक हेलिपॅड आणि स्विमिंग पूल देखील असेल.