Breakup Story | खरंच प्रियंका चोप्राने शाहिद कपूरची फसवणूक केली होती? जाणून घ्या काय होते ब्रेकअपचे कारण

बॉलिवूड स्टार्सचे अफेअर आणि त्यानंतर ब्रेकअप ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. कधीकधी तर हे कलाकार अनेक वर्षांचे प्रेमाचे नाते तोडतात आणि कधीकधी ते आपल्या लग्नापासूनच फारकत घेतात. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor).

Breakup Story | खरंच प्रियंका चोप्राने शाहिद कपूरची फसवणूक केली होती? जाणून घ्या काय होते ब्रेकअपचे कारण
प्रियंका-शाहिद

मुंबई : बॉलिवूड स्टार्सचे अफेअर आणि त्यानंतर ब्रेकअप ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. कधीकधी तर हे कलाकार अनेक वर्षांचे प्रेमाचे नाते तोडतात आणि कधीकधी ते आपल्या लग्नापासूनच फारकत घेतात. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor). या जोडीचे नातेही सर्व निकषांमधून गेले आणि शेवटी या प्रेमाचा, या नात्याचा अंत झाला (Is it true that Priyanka Chopra cheated on shahid kapoor know about their breakup story).

एक काळ असा होता की मीडियामध्ये शाहिद कपूर आणि प्रियंका चोप्राच्या अफेअरविषयी बर्‍याच बातम्या येत असत. असं म्हणतात की, करीनापासून विभक्त झाल्यानंतरच शाहिद प्रियांकाच्या जवळ आला होता. दोघांनी कधीही प्रेमाबद्दल उघडपाने भाष्य केलं नाही. परंतु, तरीही त्यांचे प्रेम आणि ब्रेकअप नेहमीच चर्चेत राहिले. चला तर, जाणून घेऊया शाहिद आणि प्रियंकाच्या या अधुऱ्या प्रेमकहाणी विषयी जाणून घेऊया…

अशी झाली प्रेमाची सुरुवात!

शाहिद आणि प्रियांकाने प्रथमच ‘कमिने’ या चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटाच्या दरम्यानच दोन्ही कलाकार एकमेकांच्या जवळ आले होते. मीडिया रिपोर्टनुसार या दोघांनी गोव्यातील एका खासगी पार्टीमध्ये अगदी साखरपुडा देखील उरकला होता. परंतु, याची पुष्टी झालेली नाही.

जेव्हा प्रेमाची चर्चा सुरू झाली…

जेव्हा शाहिद आणि प्रियंका यांचे नाते त्यांना एकमेकांच्या जवळ आणत होते, तेव्हा प्रत्येकाला त्यांच्या अफेअरविषयी माहिती मिळू लागली होती. एके दिवशी सकाळी शाहिद कपूर रात्रीच्या पार्टीनंतर प्रियंका चोप्राला घरी सोडण्यासाठी आला, तेव्हा या प्रकरणाला आणखी हवा मिळाली होती.

यानंतर आयकर विभागाने प्रियंकाच्या घरी छापा टाकला, त्यावेळी देखील शाहिद तिच्या घरी होता. बातमीनुसार, जेव्हा प्राप्तिकर विभागाने सकाळी प्रियांकाच्या घरी छापा टाकला, तेव्हा शाहिदनेच दरवाजा उघडला होता. म्हणजेच तो सकाळीच प्रियांकाच्या घरी हजर झाला होता, त्यानंतर या दोघांच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरू झाली (Is it true that Priyanka Chopra cheated on shahid kapoor know about their breakup story).

प्रियंकाने केले दुर्लक्ष

एबीपी न्यूजच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर जेव्हा प्रत्येकजण प्रियंका-शाहिदबद्दल बोलू लागला, तेव्हा प्रियंकाने शाहिदकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली. बिझी शेड्यूलचे निमित्त देऊन ती शाहिदपासून अंतर ठेवू लागली होती. बातमीनुसार शाहिद त्यावेळी प्रियंकावर लक्ष ठेवून होता. पण, अमर उजालाच्या वृत्तानुसार प्रियांका शाहिदपासून कामामुळे नव्हे, तर दुसर्‍या एका व्यक्तीमुळे अंतर ठेवत होती. त्या वृत्तानुसार अभिनेत्री त्यावेळी एका मोठ्या स्टारला डेट करत होती. हेच एकमेव कारण होते की, हळूहळू दोघे विभक्त झाले आणि अचानक प्रियंकाशी नाते तुटल्यानंतर शाहिदने मीराबरोबर विवाह करण्याची घोषणा केली.

ब्रेकअपबद्दल काय म्हणाला शाहिद

या दोघांच्या ब्रेकअपनंतर शाहिद कपूर एकदा चित्रपट निर्माता करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये गेला’ होता. तिथे त्याने प्रियंकाचे नाव न घेता म्हटले होते की, एका प्रसिद्ध सेलिब्रिटीने त्यांची फसवणूक केली आहे. त्यावेळी शाहिदचा थेट इशारा प्रियंकाकडे असल्याचे म्हटले जात होते.

त्याच वेळी, जेव्हा प्रियंकाने निक जोनसशी लग्न केले आणि मुंबईत पार्टी दिली, तेव्हा शाहिद पत्नी मीरासमवेत तिथे पोहोचला होता. शाहिद पार्टीत पोहोचला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, सगळ्या जुन्या गोष्टी विसरत त्यांनी मैत्री कायम ठेवली.

(Is it true that Priyanka Chopra cheated on shahid kapoor know about their breakup story)

हेही वाचा :

अभिनेत्री हनिया आमीरच्या इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान चाहत्याचे घृणास्पद कृत्य, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Video | मुंबईचा पाऊस पाहून राखी सावंतला आठवलं ‘टिप टिप बरसा पानी..’, माध्यमांचे कॅमेरे पाहताच धरला ठेका!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI