‘माझ्या हिप्सवर मारायचे,माझ्या नाकाला…’ राजेश खन्ना फार पझेसिव्ह होते, अभिनेत्रीने केला खुलासा

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने राजेश खन्ना यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. जे जाणून नक्कीच कोणालाही आश्चर्य वाटले. तसेच राजेश खन्ना या अभिनेत्रीच्या बाबत पझेसिव्ह का होते? हे देखील त्यांनी सांगितलं आहे.

माझ्या हिप्सवर मारायचे,माझ्या नाकाला... राजेश खन्ना फार पझेसिव्ह होते, अभिनेत्रीने केला खुलासा
Rajesh Khanna
Image Credit source: instagram
| Updated on: Jun 02, 2025 | 6:26 PM

बॉलिवूड अभिनेत्री मुमताज या भूतकाळातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहेत. चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहायचे. एक काळ असा होता जेव्हा मुमताज केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही पडद्यावर अधिराज्य गाजवत असे. राजेश खन्ना सोबतची त्यांची जोडी पडद्यावर खूपच हिट झाली. दोघांनीही सुमारे 15 चित्रपटांमध्ये काम केले आणि सर्व चित्रपट हिट झाले. पडद्यावर त्यांची केमिस्ट्री इतकी कमाल होती की त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मुमताजने स्वतः याबद्दल सांगितले आहे.

पहिल्याच चित्रपटानंतर राजेश खन्नांशी नाव जोडलं गेलं

77 व्या वर्षीय अभिनेत्री मुमताज यांनी अलीकडेच एका मुलाखतीत त्यांच्या आणि राजेश खन्ना यांच्या नात्याबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या राजेश खन्नांसोबत काम करण्यापूर्वी त्या त्यांना ओळखत नव्हत्या. मुमताज म्हणाल्या की ‘मी जेव्हा राजेश खन्ना यांना पाहिलं तेव्हा मी निर्मात्यांना राजेश खन्ना यांना विचारण्यास सांगितले की त्यांना माझ्यासोबत काम करायचे आहे का? अशाप्रकारे या जोडीला ‘दो रास्ते’ हा पहिला चित्रपट मिळाला.”

राजेश खन्ना यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर खुलासा

राजेश खन्नासोबतच्या तिच्या नात्याबद्दल मुमताज म्हणते की ते तिच्याशी खूप प्रमाणे वागत असतं आणि ते दोघेही खूप चांगले मित्र होते. अभिनेत्याशी असलेल्या नात्याबद्दल त्या बालल्या बहुतेक लोकांना असे का वाटलं की त्या दोघांचेही प्रेमसंबंध आहेत. अभिनेत्री सांगितले की जेव्हा कोणी एका नायकासोबत 15 चित्रपट करतं तेव्हा त्यांच्यातील नात अधिक घट्ट होत जातं. मुमताज यांनी सांगितलं की “काका हे फक्त माझ्यासोबतच मस्ती करायचे. आमच्यातील नाते इतके घट्ट होते कधीकधी, राजेश खन्ना माझ्या कंबरेवर मारायचे किंवा त्यांच्या नाकाने माझ्या नाकाला स्पर्श करायचे”

राजेश खन्ना पझेसिव्ह होते…

मुमताज यांनी पुढे सांगितले की ‘हे सर्व पाहिल्यानंतर लोक म्हणायचे की यांचे नक्कीच अफेअर सुरु आहे. ते इतके जवळ आहेत. लोक असही म्हणायचे की मुमताज काकांनाच का चिकटून राहते तशी ती इतर कोणाशीही चिकटून राहत नाही. काहीतरी चाललंय. राजेश खन्ना माझ्याबद्दल फार पझेसिव्ह होते. कारण प्रत्येक पुरूष त्याच्या आवडत्या स्त्रीबद्दल पझेसिव्ह असतो” असे अनेक किस्से सांगत मुमताज यांनी त्यांच्या आणि राजेश खन्ना यांच्या नात्याबद्दलचे सगळेच कंगोरे सांगितले.

राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर या दोघांनी ‘आपकी कसम’, ‘रोटी’, ‘बंधन’, ‘प्रेम कहानी’, ‘सच्चा झूठा’, ‘दो रास्ते’ आणि ‘अपना देश’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.