
मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात सापडते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना उर्फी जावेद दिसते. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ कायमच तूफान व्हायरल होतात.
मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाही. उर्फी जावेद हिच्यावर सतत तिच्या कपड्यांमुळे टिका देखील केली जाते. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच चक्क झाडाच्या सालीपासून कपडे तयार केले. उतकेच नाही तर एकदा शर्ट न घालता थेट हातामध्ये नाश्त्याच्या प्लेट घेत तिने फोटोशूट केले.
उर्फी जावेद हिचे बऱ्याच वेळा काैतुक देखील केले जाते. नुकताच आता सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसलाय. काही लोक या व्हिडीओची खिल्ली उडवताना दिसत आहेत. दुसरीकडे उर्फी जावेद हिच्या चाहत्यांना तिचा हा लूक आवडलाय.
उर्फी जावेद हिचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गुलाबी रंगाच्या सात शर्ट पासून तिने आपला अनोखा ड्रेस तयार केला आहे. उर्फी जावेद हिचा हा ड्रेस आता चर्चेचा विषय ठरला आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा ड्रेस घालून उर्फी मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे या लूकसोबतच उर्फी जावेद हिने खास मेकअप केल्याचे देखील दिसतंय.
उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, चला मला पहिल्यांदाच उर्फी जावेद हिचा लूक आवडलाय. दुसऱ्याने लिहिले की, उर्फी जावेद हे सात शर्ट कोणाचे आणलेत? तिसऱ्याने लिहिले की, आता यानंतर मी कधीच गुलाबी रंगाचा शर्ट घालणार नाहीये, लोक मला उर्फीच्या नावाने चिडवतील.
उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमध्ये मिळाली आहे. उर्फी जावेद कायमच चर्चेत असणारे नाव ठरली आहे.