Tv9 Special : रंगांधळेपणा म्हणजे नेमकं काय? कोणते रंग दिसायचे बंद होतात?, जाणून घ्या सविस्तर

आपल्या शरीरात डोळे हे अतिशय महत्त्वाचं आणि संवेदनशील असं ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्यांशिवाय आपण जगू पाहू शकत नाहीत. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं, डोळ्यांची निगा राखणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण बऱ्याचदा आपल्या प्रकृतीकडे कानाडोळा करतो आणि आयुष्य जगत असतो. आपल्या शरीरावर खरंच जेव्हा मोठा काहीतरी परिणाम बघायला मिळतो तेव्हा आपले डोळे उघडतात. त्यामुळे त्याआधीच आपण आपले डोळे उघाडून पाहिलं आणि माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण खूप मोठ्या संकटातून वाचू शकतो. याशिवाय कोणतीही परिस्थिती आली तरी घाबरुन जाण्याची गरज नाही. कारण त्यावर उपाय हा असूच शकतो. या सर्वच गोष्टींचा विचार करता आम्ही आज आपल्याला रंगांधळेपणा या आजाराशी संबंधित माहिती देणार आहोत. सप्टेंबर महिना हा रंगांधळेपणा आजाराच्या जागृतीचा महिना ओळखला जातो. याशिवाय जगभरात अनेकांना या आजाराला सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे हा आजार नेमका काय आहे, तो कसा ओळखावा, त्याच्यावर निदान कसं करावं? याबाबत तज्ज्ञ डॉक्टर जयंत सरवटे (अपवर्तक लेसर सर्जन, डॉ अग्रवालस् डोळ्यांचे हॉस्पिटल, सातारा) यांनी अतिशय मौल्यवान आणि महत्त्वाची माहिती 'टीव्ही 9 मराठी'ला दिली.

Tv9 Special : रंगांधळेपणा म्हणजे नेमकं काय? कोणते रंग दिसायचे बंद होतात?, जाणून घ्या सविस्तर
| Updated on: Sep 25, 2024 | 9:10 PM

रंगांधळेपणा किंवा रंगदृष्टीची कमतरता ही एक अशी स्थिती आहे, जिथे व्यक्तींना विशिष्ट रंगांमध्ये फरक ओळखण्यात अडचण येते. ही स्थिती प्रामुख्याने रेटिनाच्या कोन सेलमधील फोटोपिगमेंट्सवर परिणाम करणाऱ्या अनुवांशिक घटकांमुळे उद्भवते. जे रंगाचा शोध घेणे; तसेच त्यांचा अर्थ लावण्यासाठी जबाबदार असतात. जरी रंगांधळेपणा सामान्यतः अपरिवर्तनीय असला, तरी त्याचे परिणाम, सुरुवातीची लक्षणे समजून घ्या. रंगांधळेपणाची कारणे 1. अनुवांशिक घटक :- रंगांधळेपणाचे सर्वात सामान्य कारण अनुवांशिकता आहे. विशेषतः एक्स गुणसूत्रावरील उत्परिवर्तन. या अनुवांशिक संक्रमणाच्या पद्धतीचा अर्थ असा आहे की दोन गुणसूत्र असलेल्या महिलांच्या तुलनेत केवळ एक एक्स गुणसूत्र असलेल्या पुरुषांमध्ये रंगांधळेपणा अधिक सामान्य आहे. अनुवांशिक रंगांधळेपणाच्या प्राथमिक प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा