भारताने जप्त केलेल्या त्या 3 जहाजांबद्दल धक्क्कादायक माहिती पुढे , थेट या देशाने..

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव जगाने बघितला. मात्र, अमेरिकेच्या अनेक धमक्यांनंतरही इराणने माघार घेतली नाही. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावण्याची घोषणा केली. आता भारताने नुकताच मोठी कारवाई केली आहे.

भारताने जप्त केलेल्या त्या 3 जहाजांबद्दल धक्क्कादायक माहिती पुढे , थेट या देशाने..
Mumbai 3 oil tanker action
| Updated on: Feb 17, 2026 | 9:19 AM

अमेरिका आणि इराणमधील तणाव प्रचंड वाढताना दिसला. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते, असे सांगितले जात होते. अमेरिका इराणमधील आंदोलनाला एकप्रकारे पाठबळ देताना दिसली. इराण सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. यादरम्यान काही आंदोलकांवर सरकारकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी अमेरिकेने म्हटले की, इराणमधील लढा शेवटच्या टप्प्यात असून इराणी लोक विजयाच्या अत्यंत जवळ आहेत. अमेरिकेने हे आंदोलन भडकवल्याचे सांगत काही तास इराणमधील इंटरनेट सेवाही बंद होती. इराणने स्पष्ट केले की, आमच्याकडे कोणी हात पुढे करेल तर त्याची हात कापून टाकली जातील. आमच्यावर हल्ला केला तर आम्ही जगाला उद्धवस्थ करू. यासोबतच इराणला अडचणीत आणण्याकरिता अमेरिकेने थेट इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर टॅरिफ लादले.

अमेरिकेने इराणच्या काही तेल कंपन्यांवर मोठी कारवाई करत थेट त्यांच्यावर बंदी घातली. भारत आणि इराणमधील संबंध कायमच चांगले राहिले. भारत आणि इराण एकमेकांसोबत मोठा व्यापारही करतात. आता नुकताच मुंबईजवळच्या समुद्रात भारताकडून इराणच्या तेलवाहू जहाजावर मोठी कारवाई करण्यात आली. तीन जहाजे भारताने जप्त केली आहेत. ही तिन्ही तेलवाहू जहाज इराणचे आहेत.

अमेरिकेने निर्बंध लादलेली तीन तेलवाहू जहाजे भारताने जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र, इराणी तेल कंपन्यांनी या जहाजांसोबत आपला संबंध नसल्याचे म्हटले. अस्फाल्ट स्टार, स्टेलर रूबी, अल जाफझिया अशी जप्त केलेल्या तेलवाहू जहाजांची नावे आहेत. बेकायदेशीररित्या ही जहाजे भारताच्या हद्दीत घुसल्याची माहिती मिळतंय. कच्च्या तेलाचा स्त्रोत लपवून ठेवण्याकरिता भारतीय सागरी हद्दीचा वापर केला जाऊ नये, याकरिता भारताकडून ही कारवाई करण्यात आली.

स्टेलर रूबी आणि अल जाफझिया या दोन्ही जहाजांचा इराणशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या तेलवाहू जहाजांच्या कारवाईनंतर इराणने या जहाजांसोबत आपला संबंध नसल्याचे म्हटले. अमेरिकेने दिलेल्या धमक्यांना त्याच शब्दात उत्तर देताना इराण दिसला. अमेरिका इराणवर हल्ला करणार असे सतत सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर अमेरिकेने एक पाऊस मागे घेतले.