हैद्राबादमध्ये लॉकडाऊन दरम्यान बंद दुकानातून 70 हजारांची दारु चोरी

| Updated on: Apr 04, 2020 | 11:16 PM

हैद्राबादमध्ये लॉकडाऊन दरम्यान दारुचे बंद दुकान चोरट्यांनी फोडून 70 हजार रुपयांची दारुची आणि 15 हजार रुपये (thief alcohol in locked wine shop) चोरी केले.

हैद्राबादमध्ये लॉकडाऊन दरम्यान बंद दुकानातून 70 हजारांची दारु चोरी
Follow us on

हैद्राबाद : हैद्राबादमध्ये लॉकडाऊन दरम्यान बंद दारुचे दुकान चोरट्यांनी फोडून 70 हजार रुपयांची दारुची आणि 15 हजार रुपये (thief alcohol in locked wine shop) चोरी केले. ही घटना हैद्राबादमधील गांधीनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध (thief alcohol in locked wine shop) घेत आहे.

लॉकडाऊनमध्ये दारुचे दुकानं बंद आहेत. त्यामुळे हैद्राबादमधील गांधीनगर येथील बोईगुडामधील वेंकटेश्वरा वाइन शॉपच्या छतावरुन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि 70 हजारांची दारु आणि 15 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली.

चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पण गोडाऊनमधील सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद झाली नाही. कारण चोरट्यांनी तेथील सीसीटीव्हीची वायर कापून टाकली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

तेलंगणामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान राज्यातील सर्व दारुची दुकानं बंद आहेत. तेव्हापासून मद्यपान करणाऱ्यांचे हाल होत आहेत. दारु नसल्यामुळे त्यांची मानसिक अवस्थाही बिघडत आहेत. काही ठिकाणी तर अधिक किमतीने दारुची विक्री केली जात आहे.