Nashik| प्रवाशाला Mask नसेल, तर वाहनचालकाला भुर्दंड…

नाशिककरांनो प्रवासासाठी बाहेर पडताय. एक गोष्ट लक्षात ठेवा. वाहनात बसल्यानंतरही मास्क जरूर घाला. अन्यथा तुम्हाला दंड ठोठावण्यासाठी वाहतूक पोलीस चौकाचौकात तुमची वाट पहात आहेत.

Nashik| प्रवाशाला Mask नसेल, तर वाहनचालकाला भुर्दंड...
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः नाशिककरांनो प्रवासासाठी बाहेर पडताय. सहकुटुंब जात आहात किंवा एकटे. एक गोष्ट लक्षात ठेवा. वाहन कुणाचेही असू द्या. तुमचे अथवा भाड्याचे. आत बसल्यानंतरही मास्क जरूर घाला. अन्यथा तुम्हाला दंड ठोठावण्यासाठी वाहतूक पोलीस चौकाचौकात तुमची वाट पहात आहेत.

नेमके प्रकरण काय?

सध्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूने सगळ्यांनाच धडकी भरवलीय. त्यात नाशिक जिल्ह्यात अजूनही कोरोना रुग्ण सापडत आहेतच. लसीकरणाची गती संथ झालीय. त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा बसवा म्हणून प्रशासन आक्रमक झाले आहे. त्यांनी मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. तुम्ही मास्क घातलेला नसेल, तर तर आता चक्क वाहनचालकाही दंड करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात किती आहेत वाहने?

नाशिक जिल्ह्यात सध्या 2 लाख 62 हजार 265 कार आणि जीप आहेत. तर 6 हजार 772 टॅक्सी आहेत. शिवाय 27 हजार 796 रिक्षा आहेत. त्यामुळे एखाद्या प्रवाशाने मास्क घातला नसेल, तर त्या टॅक्सीचालक अथवा रिक्षाचालकाला पोलीस जबाबदार धरून दंड ठोठावू शकतात. त्यामुळे आत्ताच सावध व्हा. नवा मास्क नसेल, तर लागलीच दंड बसण्यापूर्वी खरेदी करा.

तर व्यापाऱ्यांना दंड

नाशिक महापालिका हद्दीत एखाद्या दुकानात ग्राहक विनामास्क आला, तर दुकानदाराला दंड ठोठावण्यात येणार आहे. असा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला आहे. त्यामुळे व्यापारी नाराज आहेत. सध्या तरी कोणावरही कारवाई सुरू करण्यात आली नाही. मात्र, गेल्या आठवड्यात जवळपास 22 नागरिकांकडून 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मास्क हाच पर्याय

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लसीचे दोन्ही डोस आवश्य घ्यावेत, असेही सांगण्यात आले आहे. कारण तूर्तास तरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस आणि मास्क हेच दोन पर्याय आहेत.

इतर बातम्याः

Love of animals| गुंतले प्राण या रानात माझे, आधी वासराला पाजले, गाईची धार काढली, त्यानंतरच नववधूसह गृहप्रवेश; एका निरागस प्रेमाची गोष्ट…!

नाशिक जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी 402 अर्ज; देवळा येथे 4, निफाड 3, कळवणला 2 प्रभागांमधील निवडणूक रद्द

Nashik ZP | झेडपीतले कारभारी वाढणार; गटात 11 आणि गणात 22 ची वाढ, तरण्याबांड नेतृत्वाला संधी…!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI