घंटानाद करा, नाही तर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका; महापौरांचा राज ठाकरेंवर पलटवार

मंदिरं सुरू केली नाही तर आम्ही घंटानाद आंदोलन करू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे. (mayor kishori pednekar slams raj thackeray over ghantanaad agitation)

घंटानाद करा, नाही तर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका; महापौरांचा राज ठाकरेंवर पलटवार
mayor kishori pednekar

मुंबई: मंदिरं सुरू केली नाही तर आम्ही घंटानाद आंदोलन करू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे. घंटानाद करा नाही तर आणखी कसला नाद करा. पण आमचा नाद करायचा नाही, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. (mayor kishori pednekar slams raj thackeray over ghantanaad agitation)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. मनसेने कोरोनाचे नियम झुगारून दहीहंडी साजरी केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकिय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. पण त्यांचं या मागे राजकारण आहे. हे सर्वसामान्य लोकांनाही माहीत आहे, असं पेडणेकर म्हणाल्या. विरोधकांनी भावनेचा नाही लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बिळात जातात, असा टोलाही त्यांनी लगावला.

तेव्हा मनसेचा नेता रडत होता

यावेळी त्यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या व्हायरल व्हिडिओवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मनसेच्या एका नेत्याचा कोव्हिडच्या आधीच्या लाटेतला रडतानाचा व्हिडीओ मला अनेकांनी दाखवला. तेव्हा हे रडत होते. आता हे दहिहंडीसाठी लोकांना गर्दी करण्याकरता उकसवत आहेत. यांचं तेव्हाच वागणं खरं की आताचं वागणं खरं हे समजत नाही. मनसेच्या `त्या´ नेत्याचे अश्रू हे `मगरमच्छ के आंसू´ समजायचे का?, असा सवाल त्यांनी केला.

तर संपूर्ण सोसायटी सील होणार

मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहे. विशेषत: इमारती सील करण्याच्या मोहिमेवर आमचं लक्ष आहे. पाच माणसांना कोरोनाची लागण झालेलं आढळल्यास ती इमारत किंवा सोसायटी सील करण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मार्शलना फैलावर घेतलं

यावेळी त्यांनी मास्कशिवाय फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली नाही म्हणून मार्शल अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. मुंबईत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य कारवाई करा, असे आदेशच त्यांनी या मार्शलना दिले. फोनवरूनच त्यांनी या मार्शल अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.

तर मार्शलवरही कारवाई

मास्क न घालता फिरणारे अनेक लोक हुज्जत घालत असतात. अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हुज्जत घालून अरेरावी करणाऱ्या मार्शल विरोधात तक्रारी आल्यास अशा क्लिनअप मार्शलवरही कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक क्लिनअप मार्शलची आणि वॉर्डाची ओळख दर्शवणारा ठळक क्रमांक गणवेशावर देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनाही तक्रार करणे शक्य होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. (mayor kishori pednekar slams raj thackeray over ghantanaad agitation)

 

संबंधित बातम्या:

VIDEO : एकाच व्यासपीठावर शेजारी बसले, ना एकमेकांकडे पाहिलं, ना बोलले, भाषणाची वेळ येताच जोरदार टोलेबाजी!

‘वरुण सरदेसाई भाचा आहे म्हणून सूट देताय का?’ मनसे नेत्याचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना नाव न घेता टोला

(mayor kishori pednekar slams raj thackeray over ghantanaad agitation)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI