AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी 7 आणि 21 मार्चला बंद; ‘या’ मार्गाने करा प्रवास

मुंबईतील मुंब्रा बायपास हा आज रविवार 7 मार्च आणि रविवार 21 मार्च रोजी या दोन दिवशी (Mumbra Bypass Closed For Travel 7 And 21St March) वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी 7 आणि 21 मार्चला बंद; ‘या’ मार्गाने करा प्रवास
Mumbra Bypass
| Updated on: Mar 07, 2021 | 1:01 PM
Share

ठाणे : मुंब्रा बायपास हा आज रविवार 7 मार्च आणि रविवार 21 मार्च रोजी या दोन दिवशी (Mumbra Bypass Closed For Travel 7 And 21St March) वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. मुंब्रा बायपास मार्गावर लोखंडी रेल्वेपूल उभारणीचे काम दोन दिवस करण्यात येणार आहे (Mumbai Mumbra Bypass Closed For Travel 7 And 21St March).

या दिवशी मुंब्रा बायपास हा रस्ता वाहतुकीसाठी 24 तास बंद राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या मार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

Mumbra Bypass

Mumbra Bypass

असा असेल पर्यायी मार्ग –

– वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएनपीटीकडून मुंब्रा बायपासमार्गे नाशिक, भिवंडी आणि ठाणे ग्रामीणकडे जाणाऱ्या वाहनांना कळंबोली सर्कल, न्हावडे फाटा, तळोजे, एमआयडीसी, उसाटणे, खोणी, नेवाळी मार्गे, कल्याणमधून दुर्गाडीमार्गे भिवंडीकडे सोडण्यात येणार आहे.

– तर नाशिकडे जाणाऱ्या वाहनांना आधारावाडी जेल, बांपगांव, पडघा नाका येथून मुंबई-नाशिक महामार्गाने नाशिकला जाता येईल.

– तर ठाण्यातून जाण्यासाठी कल्याणफाटा, शिळफाटा येथून महापे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर टोलनाक्यावरून घोडबंदर रोडने माजीवड्यामार्गे जाता येईल (Mumbai Mumbra Bypass Closed For Travel 7 And 21St March).

– गुजरात, पालघर येथून घोडबंदरमार्गे येणाऱ्या वाहनांना घोडबंदर रोडवरून ऐरोलीमार्गे नवी मुंबईकडे रवाना करण्यात येणार आहे. तर नाशिकडून येणाऱ्या वाहनांनाही कल्याणमार्गे नवी मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.

Mumbai Mumbra Bypass Closed For Travel 7 And 21St March

संबंधित बातम्या :

इचलकरंजीत रस्ता सुरक्षा अभियान, बेवारस वाहने, हातगाड्या आणि जाहिरातींचे फलक जप्त

अखेर पत्रीपुलाचा गर्डर बसविण्यासाठी मुहूर्त मिळाला, 21 आणि 22 नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर चार तासांचा मेगाब्लॉक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.