AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या माजी खासदाराचा शिंदे गटात प्रवेश, उद्धव ठाकरे जबाबदार? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

Milind Deora join Shinde Group : काँग्रेसला रामराम ठोकत माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदेंचं धनुष्य हाती घेण्याचं ठरवलं आहे. मिलिंद देवरांच्या राजीनाम्याला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची जोरदार चर्चा याचं कारण जाणून घ्या.

काँग्रेसच्या माजी खासदाराचा शिंदे गटात प्रवेश, उद्धव ठाकरे जबाबदार? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Milind Deora Uddhav Thackeray Rahul Gandhi
| Updated on: Jan 14, 2024 | 3:29 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला आहे. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला आर्थिक राजधानीमध्ये खिंडार पडलं आहे. मिलिंद देवरा यांच्या घराचं आणि काँग्रेस पक्षाचं गेली साडे पाच दशक नातं आहे. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेस पक्षातील मोठे नेते होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूर येथून भारत जाडो न्याय यात्रा सुरू केली आहे. देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेंचं धनुष्य हाती घेण्याचं ठरवलं आहे. मिलिंद देवरा यांच्या या निर्णयाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचं बोललं जात आहे? उद्धव ठाकरे यासाठी कसे जबाबदार? ठाकरे यांचा देवरा यांच्या राजीनाम्याशी काय संबंध? जाणून घ्या.

देवरा यांनी कोणत्या कारणामुळे दिला राजीनामा?

शिवसेना पक्ष आता दोन गटात विभागला गेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गट ही प्रमुख शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. येत्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाची जागा सोडण्यास नकार दिला आहे. आता राज्यात महाविकास आघाडी असल्याने त्या ठिकाणी ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनाच तिकिट मिळणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी थेट शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा.

लोकसभा निवडणुकीमध्ये 2014 साली मोदी लाटेमुळे मिलिंद देवरा यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019 मध्येही मिलिंद देवरा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सलग दोनवेळा देवरा यांना शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी निवडणुकीमध्ये पराभूत केलं होतं. यंदा I.N.D.I.A. युतीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे एकत्र असल्याने देवरा यांना तिकिट मिळालं नसतं.

…म्हणून शिंदे गटात जाण्याचा निर्णय

मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात जाण्यामागे मोठं कारण आहे. ते म्हणजे शिंदे गटात गेल्याने त्यांना परत एकदा तिकिट मिळणार आहे. भाजप आणि शिंदे गटाची युती असली तरीसुद्धा शिंदे गटच या जागेवरून निवडणुक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाऊनही देवरा यांना तिकिट मिळालं नसतं. म्हणूनच गेल्या 56 वर्षांचा काँग्रेससोबतचा प्रवास थांबवण्याचा निर्णय देवरा यांनी घेतला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.