AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai : फ्लेमिंगो अधिवास संरक्षणासाठी उचित कार्यवाही करण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या वन विभागास सूचना

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात टी. एस. चाणक्य भारतीय समुद्री विश्वविद्यालय नेरुळ, आणि एन.आर.आय. कॉम्प्लेक्स, सेक्टर-56, सिवूड्स, नेरुळ येथील मागील बाजूस विस्तृत सागरी खाडी (वनक्षेत्र) आहे. या भागात दरवर्षी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये साधारणत: नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात फ्लेमिंगो पक्षांचे मोठ्या प्रमाणात आगमन होत असते.

Navi Mumbai : फ्लेमिंगो अधिवास संरक्षणासाठी उचित कार्यवाही करण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या वन विभागास सूचना
प्रभाग रचनेवर हजारो हरकती
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 1:28 AM
Share

नवी मुंबई : फ्लेमिंगो पक्ष्यांमुळे नवी मुंबई शहराची ओळख ‘फ्लेमिंगो सिटी’ (Flemingo City) म्हणून रुढ होताना दिसत आहे. तथापि काही व्यक्तींनी खाडीच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये बांध घातल्याने सागरी भरती – ओहोटीच्या पाण्याची पाणथळ भागात ये – जा होत नाही, त्यामुळे सदर पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये बदल झाल्यास, फ्लेमिंगोचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो अशी चिंता काही पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांच्याकडेही या विषयामध्ये लक्ष घालण्याची विनंती पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आलेली आहे. त्यानुसार आयुक्तांनी विभागीय वन अधिकारी, ठाणे यांना पत्राव्दारे याबाबत प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन वस्तुस्थिती आढळल्यास फ्लेमिंगोचा अधिवास राहण्यासाठी आपल्या विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे सूचित केले आहे. (Instructions to the Forest Department for appropriate action to protect flamingo habitats)

नोडल अधिकारी वन विभागाशी समन्वय ठेवणार

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात टी. एस. चाणक्य भारतीय समुद्री विश्वविद्यालय नेरुळ, आणि एन.आर.आय. कॉम्प्लेक्स, सेक्टर-56, सिवूड्स, नेरुळ येथील मागील बाजूस विस्तृत सागरी खाडी (वनक्षेत्र) आहे. या भागात दरवर्षी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये साधारणत: नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात फ्लेमिंगो पक्षांचे मोठ्या प्रमाणात आगमन होत असते. त्यांचा अधिवास साधारणत: 3 ते 4 महिन्यांचा असतो. याविषयी वन विभागाशी समन्वय ठेवण्याकरीता नोडल अधिकारी म्हणून प्रशासन तथा परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत दिल्या सूचना

दूर देशातून नवी मुंबईत थंडीच्या कालावधीत येणारे फ्लेमिंगो पक्षी हे नवी मुंबईच्या जैवविविधतेत लक्षणीय भर घालणारे वैशिष्ट्यपूर्ण पक्षी वैभव आहे. आभाळाचे प्रतिबिंब पडलेल्या पाणथळ जागेतील निळ्याशार पाण्यावर हिरव्यागार वातावरणात फ्लेमिंगो पक्ष्यांचा समूह जणू गुलाबी चादर अंथरल्यासारखा दिसतो. त्यामुळे पक्षीप्रेमीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही दूरच्या शहरांतून फ्लेमिंगो दर्शनासाठी नवी मुंबईत येत असतात. त्यानुसार ‘फ्लेमिंगो सिटी’ ही नवी मुंबईची नवी ओळख जपण्याच्या भूमिकेतून फ्लेमिंगोचा अधिवास कायम रहावा यादृष्टीने पर्यावरण प्रेमींमार्फत व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेच्या अनुषंगाने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करणेबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत वन विभागास सूचित करण्यात आलेले आहे. (Instructions to the Forest Department for appropriate action to protect flamingo habitats)

इतर बातम्या

Thane Water Supply : ठाणे शहरातील काही भागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार

Kalyan BJP : कल्याणमध्ये शिवसेना खासदाराकडून भाजपला दे धक्का सुरुच, चौथा माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.