Sanjay Raut Daughter Wedding | संजय राऊतांच्या कन्येचं लग्न, मेहंदीपासून ते लग्नापर्यंतचा असा असेल सोहळा

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. राऊत यांची कन्या पूर्वशी हिची मल्हार नार्वेकर यांच्याशी लग्नगाठ बांधली जाणार आहे. मल्हार नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपुत्र आहेत.

Sanjay Raut Daughter Wedding | संजय राऊतांच्या कन्येचं लग्न, मेहंदीपासून ते लग्नापर्यंतचा असा असेल सोहळा
Sanjay-Raut
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 6:31 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. राऊत यांची कन्या पूर्वशी हिची मल्हार नार्वेकर यांच्याशी लग्नगाठ बांधली जाणार आहे. मल्हार नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपुत्र आहेत. येत्या 29 नोव्हेंबरला मुंबईतील रेनिसंस या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राऊत यांची कन्या पूर्वशीच्या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. या विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत सपत्निक राजभवनावर गेले होते. त्याच प्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन शरद पवारांसह संपूर्ण कुटुंबाला मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देत लग्नाची पत्रिका दिली. याबरोबर काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

कसा असेल सोहळा

या शुभ सोहळ्याची सुरुवात  27 नोव्हेबर रोजी मुंबईतील रेनिसंस हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रम आहे. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम असेल. 29 नोव्हेंबर रोजी रेनिसंस येथे लग्न समारंभ होईल. तर 1 डिसेंबर रोजी ग्रॅंड हयात येथे स्वागत सोहळा ठेवण्यात आला आहे. हे सर्व कार्यक्रम सकाळी 10.30 पासून सुरू होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या तिन्ही कार्यक्रमांना सहकुटुंब हजर राहणार आहेत.

कोण आहेत संजय राऊतांचे व्याही?

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. तर नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीसांचा अमरावती दौरा; व्यापाऱ्यांशी चर्चा करून नुकसानाचा घेतला आढावा

एकतर्फी कारवाई केली तर जेलभरो आंदोलन करू, अमरावती हिंसाचारप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

ST Strike| आंदोलन दडपणे सुरू, 40 कर्मचाऱ्यांना डांबले, हिंसक वळण लागेल; भाजप नेते दरेकरांचा सरकारला इशारा