नेपाळचा संदर्भ दिल्यावर यांना मिरच्या झोंबतात, पण राज्यकर्त्यांनी असाच नेपाळ लुटला, संजय राऊतांची गंभीर टीका

नुकताच संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यावरील कर्जाबद्दल ते बोलताना दिसले. यासोबतच त्यांनी लोढांच्या काैशल्य विकास विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचाही दावा देखील केला. नेपाळबद्दलही त्यांनी भाष्य केले.

नेपाळचा संदर्भ दिल्यावर यांना मिरच्या झोंबतात, पण राज्यकर्त्यांनी असाच नेपाळ लुटला, संजय राऊतांची गंभीर टीका
Sanjay raut
| Updated on: Sep 16, 2025 | 10:42 AM

संजय राऊत यांनी सरकारवर अत्यंत मोठा आरोप केली आहेत. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात जात विरोध जात भांडण लावून लोकांचे लक्ष विचलित केले जातंय. फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जातंय. शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत या महाराष्ट्रात या सरकारच्या काळात काय प्रगती केली, याविषयी एकदा मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे संवाद साधला पाहिजे. इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे की, या लुटीचा परिणाम महाराष्ट्रावर दहा लाख कोटींच्यावर कर्जाचा डोंगर झाला. राज्याची आर्थिक दुरवस्था इतकी कधीच झाली नव्हती. आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यावरती काही भाष्य करणार आहेत का? त्यांना आर्थिक शिस्तीची फार जास्त काळजी असते.

पुढे संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे स्वत:च्या लोकांना महाराष्ट्र लूट देत आहेत, हे धोरण आहे. देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील एक तिकडे ते डाकू बसलेलेच आहेत अमित शहांच्या कृपेने चंबलखोऱ्यातूनच ते इथे आले आहेत महाराष्ट्र लुटायला. काय होणार या महाराष्ट्राचे…काय होणार पुढल्या पिढीचे..9 लाख कोटींचे कर्ज कोणी केले? का झाले…कोणत्या योजनांमुळे झालं…चारही बाजूंनी महाराष्ट्र हा ओरबडला जातोय.

जो पैसा महाराष्ट्राच्या तिजोरी यायला हवा तो पैसा कोणाच्यातरी खिशात जातोय. तीन तीन हजार कोटींचे टेंडर अगो करून हा पैसा लुटला जातोय. दोन लाख कोटींची जी कामे मुंबई महापालिकेकडून करण्यात आली त्याचा कुठे आतापत्ताच नाही. कागदावर आहेत, ठेकेदाराकडून कमिशन घेतलंय 25 टक्के. ही लूट आहे. एसआरए प्रकल्पाबद्दलही बोलताना संजय राऊत हे दिसले. लोढांच्या काैशल्य विकास विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचाही दावा राऊतांनी केला.

आम्ही नेपाळचा संदर्भ दिला की, यांना मिरच्या झोंबतात. मग ते आम्हाला माओवादी ठरतात..नक्षलवादी ठरवतात…पण नेपाळ असाच लुटला राज्यकर्त्यांनी. त्यातून जो उद्रेक झाला तो अत्यंत धक्कादायक होता. त्याचे समर्थन मी करत नाहीये. पण लोकांच्या संयमाचा बाण इथे तुटतोय. 10 लाख कोटींचे कर्ज या राज्यावर…आणि तुम्ही या राज्याला प्रगतीपथावरचे राज्य म्हणता…अनेक योजना या फक्त राजकीय फायद्यासाठी आणल्या असेलही संजय राऊत यांनी म्हटले.