Champions Trophy स्पर्धेतून इतके खेळाडू बाहेर, कुणाकुणाला दुखापत?

Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ खेळणार आहेत. त्यापैकी 7 संघांमधील खेळाडू हे दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. जाणून घ्या ते कोण आहेत?

| Updated on: Feb 18, 2025 | 8:53 PM
1 / 6
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. त्याआधीच अनेक खेळाडू हे या स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी बांगलादेशचा अपवाद वगळता सर्व संघातून खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत.  (Photo Credit : Icc X Account)

2 / 6
आता या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत आणखी 2 खेळाडू जोडले गेले आहेत. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. (Photo Credit : Icc X Account)

3 / 6
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत या गुडघ्यात सूज आहे. त्यामुळे पंत खेळू शकणार की नाही? याबाबत शंका आहे. (Photo Credit : Rishabh Pant X Account)

4 / 6
त्याआधी एकूण 10 खेळाडूंना या स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात डोकेदुखी आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 6
नियमित कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल मार्श या तिघांना दुखापतीमुळे खेळता येणार नाही. मार्कस स्टोयनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर मिचेल स्टार्क याने वैयक्तिक कारणामुळे खेळणार नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत. तर दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्खिया आणि गेराल्ड कोएत्झी हे दोघेही दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीत. (Photo Credit : AFP)

6 / 6
तसेच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, पाकिस्तानचा सॅम अय्यूब, इंग्लंडचा जेकब बेथल, अफगाणिस्तानचा अल्लाह गजनफर आणि न्यूजीलंडचा बेन सीयर्स यांनाही दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळता येणार नाही. (Photo Credit :  Jasprit Bumrah X Account)