Video | ‘दुसऱ्याच्या इज्जतीचा तुम्हाला काही फरक पडत नाय म्हणजे काय?’ भाजप आमदार भडकले!

Video | 'दुसऱ्याच्या इज्जतीचा तुम्हाला काही फरक पडत नाय म्हणजे काय?' भाजप आमदार भडकले!
भाजप आमदाराचा व्हायरल व्हिडीओ

'बसू द्या ना, तक्रार घ्या ना.. ती आली असेल आधी, म्हणून तिची तक्रार आधी घेतली', असा दावा पोलिसांनी केला होता. त्यावर आमदार गायकवाड हे संतापले. सीसीटीव्ही फुटेज तपासून कोण पहिलं आलं ते मला बघायचंय, असा युक्तिवाद ते पोलिसांसमोर करु लागले.

अमजद खान

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 02, 2022 | 8:35 PM

कल्याण : भाजप आमदाराचा (BJP Mla) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. कल्याणमधील (Kalyan) भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड हे पोलिसांवर (Police) संतापले असल्याचं दिसून आलंय.

नेमकं काय प्रकरण?

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा हा व्हिडीओ 31 डिसेंबरचा असल्याचं सांगितलं जातंय. कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचा दावा केला जातो आहे. या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. भाजप आमदार पोलिसांवर यावेळी चांगलेच संतापल्याचं चित्र व्हिडीओमध्ये पाहायला मिळालंय.

कशामुळे भडकले आमदारसाहेब?

पोलिसांवर संतापलेले आमदार गणपत गायकवाड हे पोलिसांनी खडेबोल सुनवत असल्याचं पाहायला मिळालंय. योग्यप्रकारे पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी केला. तक्रा घेण्यास विलंब केल्याच्या कारणावरुन भाजप आमदार संतापले होते. त्यांना बसून ठेवल्यानं त्यांनी राग व्यक्त केला असल्याचं व्हिडीओतील त्यांच्या संभाषणात ऐकू येत आहे.

‘बसू द्या ना, तक्रार घ्या ना.. ती आली असेल आधी, म्हणून तिची तक्रार आधी घेतली’, असा दावा पोलिसांनी केला होता. त्यावर आमदार गायकवाड हे संतापले. सीसीटीव्ही फुटेज तपासून कोण पहिलं आलं ते मला बघायचंय, असा युक्तिवाद ते पोलिसांसमोर करु लागले. दुसऱ्याच्या इज्जतीचा तुम्हाला काही फरक पडत नाही म्हणजे काय? अधिकार आहेत माझे, असं म्हणत त्यांनी पोलिसांवरच हल्लाबोल केला. पोलिस काय फक्त पैसे वसुलीसाठी आहेत का?, असा प्रश्न त्यांनी पोलिसांनाच विचारलाय. दरम्यान, पोलिसांनी यावेळी आमदार गणपत गायकवाड यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र ही बाचाबाची तोपर्यंत एकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली होती. दरम्यान, या व्हिडीओबाबत पोलिस आणि गणपत गायकवाड यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही.

पाहा संपूर्ण घटनेचा व्हिडीओ –

इतर बातम्या –

अंबरनाथमध्ये डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या, तर्कवितर्कांना उधाण, पोलिसांकडून चौकशीला सुरुवात

Pune crime| चारित्र्यावर संशय घेत 51वर्षीय पत्नी सोबत पतीनं केलं असं काही की …..

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें