‘तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर राज्यात युतीची सत्ता असती’, गुलाबराव पाटलांची महाजनांवर कोटी

जळगाव जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात आज (20 फेब्रुवारी) राजकीय विषयांवरून चांगलाच कलगीतुरा रंगला (Gulabrao Patil and Girish Mahajan taunt to each other on same stage).

'तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर राज्यात युतीची सत्ता असती', गुलाबराव पाटलांची महाजनांवर कोटी
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 7:03 PM

जळगाव : “राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, राज्यात सरकार स्थापनेवेळी एक पाऊल पुढे टाकले असते तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती”, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना उद्देशून लगावला. गिरीश महाजन यांनी भविष्यात युतीची सत्ता पुन्हा येऊ शकते, भविष्याचं काही सांगता येत नाही, असा चिमटा गुलाबरावांसमोर काढला होता. त्यांच्या या चिमट्याला गुलाबरावांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं (Gulabrao Patil and Girish Mahajan taunt to each other on same stage).

आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये कलगीतुरा

जळगाव जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात आज (20 फेब्रुवारी) राजकीय विषयांवरून चांगलाच कलगीतुरा रंगला. महापालिकेच्या वतीने आज दुपारी केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात हे दोघी नेते एकाच व्यासपीठावर होते. यावेळी दोघांनी आपल्या भाषणात एकमेकांना राजकीय चिमटे मारण्याची संधी सोडली नाही (Gulabrao Patil and Girish Mahajan taunt to each other on same stage).

गिरीश महाजनांचे चिमटे

आपल्या भाषणात गिरीश महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जोरदार चिमटे घेतले. ते म्हणाले, पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचे लोकार्पण होत आहे. या परिसरात शिवसेनेचे अवघे तीन नगरसेवक आहेत. महापालिकेत आमचे संख्याबळ जास्त आहे. पण आम्ही दुजाभाव केला नाही. हे राज्यात आदर्श ठरणारे उदाहरण आहे. पण राज्यात असे घडले नाही. आमच्या मतदारसंघाचे पैसे तुम्ही पळवले. सत्ता आपली आहे, काल तुमची सत्ता होती. उद्या आमची सत्ता असेल, काही सांगता येत नाही. उद्या-परवा आपली सत्ता असेल. आज तर मला याठिकाणी युतीची सत्ता आहे, असेच वाटतेय. भविष्यात काय घडेल, हे सांगता येत नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

गुलाबराव पाटलांची महाजनांवर कोटी, म्हणाले ‘लव्ह मॅरेज’ केले असते तर…

गिरीश महाजन यांच्यानंतर भाषणाला आलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार कोटी केली. गुलाबराव पाटील म्हणाले, आज सत्ता आहे, पण उद्या कोणाची सत्ता येईल, हे सांगता येत नाही. गिरीश महाजन यांनी महापालिकेत कशी सत्ता आणली, हे मला चांगले माहिती आहे. त्यांनी जी रसद पुरवून सत्ता आणली ती रसद आमच्याकडे नव्हती. त्यांनी राज्यात जे केले, तेच महापालिकेतही केले. तेव्हा जर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, राज्यात सरकार स्थापनेवेळी एक पाऊल पुढे टाकले असते तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती. पण ते आपल्या हातात नाही. वरचे लोक काय करतात, कार्यकर्ता म्हणून जो रोल आपल्याला दिला जातो, तो आपल्याला करावा लागतो, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘ज्यांची गावात निवडून येण्याची क्षमता नाही ते नाथाभाऊंचे नाव घेतात’, खडसेंच्या कानपिचक्या नेमक्या कुणाला?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.