Video : ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंची जीभ घसरली

| Updated on: Aug 23, 2021 | 10:01 PM

केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलताना पुन्हा एकदा भाषा घसरलीय. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावण्याची भाषा राणेंनी केलीय. राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर जनआशीर्वाद यात्रेसाठी आहेत. त्याच वेळेस राणे महाडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.

Video : मी असतो तर कानाखाली चढवली असती, मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंची जीभ घसरली
narayan rane
Follow us on

रायगड : केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलताना पुन्हा एकदा भाषा घसरलीय. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावण्याची भाषा राणेंनी केलीय. राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर जनआशीर्वाद यात्रेसाठी आहेत. त्याच वेळेस राणे महाडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray during Jana Aashirwad Yatra)

‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ , अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली. त्यानंतर आज राणे यांची यात्रा रायगड जिल्ह्यात पोहोचली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.

चिपळूणमध्येही राणेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी टीका

राणे यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. चिपळूणमधील महपुराची पाहणी करण्यासाठी राणे आले असता, त्यांनी एका अधिकाऱ्याशी बोलताना सीएम बीएम गेला उडत असं वक्तव्य केलं होतं. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले होते की, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.”

नारायण राणे यांनी आपल्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. मात्र, असं करत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचाही अनादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलत असताना त्यांनी एकेरी भाषेचा उपयोग करत तो सीएम बीएम गेला उडत असं उद्दाम भाष्य केलं होतं. त्यामुळे यावरुन राणेंवर जोरदार टीका झाली होती.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करुन जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करुन जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. त्यावेळी ‘मी इथे सावरकारांच्या पुतळ्या वंदन करण्यासाठी आलो. त्याआधी मी माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालो, नमस्कार केला आणि सांगितलं साहेब तुम्ही आज हवे होते, मला आशीर्वाद देण्यासाठी. मला जे काही मिळालं ते साहेबांमुळे. मला साहेबांनीच घडवलंय, आजही ते असते तर म्हणाले असते नारायण तू असेच यश मिळव, माझा आशिर्वाद आहे.आणि डोक्यावर हात ठेवला असता. आज हात डोक्यावर नसला तरी साहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत. त्यामुळे कुणाही दैवताचं स्मारक असो, तिथे विरोधाची भाषा करु नये, भावनांचा विचार करावा, त्यानंतर वक्तव्य करावं’, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला.

इतर बातम्या :

लाचखोरी प्रकरणात शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं अखेर निलंबन, तर कोर्टाकडून अटी-शर्तींसह जामीन

मिलिंद नार्वेकरांनी अनधिकृत बंगला पाडला, गुन्हा का नाही? किरीट सोमय्यांचा सवाल

Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray during Jana Aashirwad Yatra