कधी काँग्रेसवासी, कधी शिवसैनिक, कधी भाजपवासी तर कधी राष्ट्रवादी, कोण आहेत माणिकराव कोकाटे?; वाचा सविस्तर

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. कोकाटे हे नेहमी चर्चेत असतात. (who is manikrao kokate, read about his political journey)

कधी काँग्रेसवासी, कधी शिवसैनिक, कधी भाजपवासी तर कधी राष्ट्रवादी, कोण आहेत माणिकराव कोकाटे?; वाचा सविस्तर
manikrao kokate

मुंबई: सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. कोकाटे हे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या चर्चेचं कारणंही हटके आहे. सतत पक्ष बदल करत असल्याने ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या चारही प्रमुख पक्षातून त्यांनी निवडणूक लढवली आहे. भाजप वगळता इतर सर्व पक्षातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. कोकाटे यांच्या या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. (who is manikrao kokate, read about his political journey)

भाजपमधून राष्ट्रवादीत

कोकाटे यांनी गेल्या 20 वर्षात अनेक पक्षाचे झेंडे खांद्यावर घेतले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे. त्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी हे वर्तुळही पूर्ण झालं. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये होते. मात्र, त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ऑक्टोबर 2019मध्ये त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला आणि सिन्नरमधून तिकीटही देण्यात आलं.

लोकसभेला अपक्ष लढले

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकही लढवली होती. त्यांना लोकसभा निवडणुकीत 1 लाख 34 हजार 299 मते मिळाली होती. एकट्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातूनच त्यांना 91 हजार 114 मते मिळाली होती.

चारही पक्षातून निवडणूक लढवली

कोकाटे हे मूळ काँग्रेसी आहेत. 1999मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, पक्षाने त्यांना सिन्नरमधून उमेदवारी दिली नाही. त्यांच्या ऐवजी तुकाराम दिघोळे यांना तिकीट दिलं. त्यामुळे कोकाटे यांनी एका रात्रीत शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदारही झाले. 2004ची विधानसभा निवडणूक ते शिवसेनेकडून लढले आणि जिंकलेही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2009मध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून आमदार झाले. त्यानंतर 2014मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना निवडणुकीचं तिकीटही दिलं. पण कोकाटे यांना पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या मालिकेला ब्रेक बसला होता. ते शिवसेनेकडून दोनदा आणि काँग्रेसकडून एकदा ते आमदार राहीलेले आहेत.

‘त्या’ शपथविधीला हजेरी

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अजितदादा समर्थक आमदारही उपस्थित होते. त्यात माणिकराव कोकाटेही उपस्थित होते. मात्र, कोकाटेंनी या शपथविधी बाबत काहीच माहिती नसल्याचं म्हटलं होतं. अजित पवार गटनेते असल्याने त्यांचा आदेश पाळला असं त्यांनी सांगितलं. कोकाटे यांनी ट्विट करून आपलं म्हणणं मांडलं होतं. मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही. अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरुन मी राजभवनावर गेलो होतो. गटनेते असल्याने आदेश पाळला. तिथे काय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हती. पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापीही बदलणार नाही, असं ट्विट करत त्यांनी या प्रकरणावर पडदा पाडला होता.

विवाह सोहळा: साधा की शाही?

माणिकराव कोकाटे यांनी कोणताही बडेजाव न करता अत्यंत साध्या पद्धतीने कन्या आणि जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी यांचा विवाह पार पाडणार असल्याचं जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी कन्येचा विवाह नोंदणी पद्धतीने केला. नाशिकच्या अकराला गंगापूर-सावरगाव रोडवरील एका रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा थाटात पार पडला. मात्र, प्रत्यक्षात हा साधा विवाह सोहळा न राहता शाही विवाह सोहळा ठरला. मेजवाणी, नृत्यसंगीत, रोषणाई, पाहुण्यांची खास बडदास्त आणि मोठा बंदोबस्त यामुळे साधा विवाह आहे की शाही विवाह असा प्रश्न सिन्नरकरांनाही पडला होता. (who is manikrao kokate, read about his political journey)

 

संबंधित बातम्या:

‘भोर म्हणजे थोपटे’ आणि ‘थोपटे म्हणजे भोर’; कोण आहेत संग्राम थोपटे?, वाचा सविस्तर

दोनदा पडला तरीही लढला, तिसऱ्यांदा पठ्ठ्या जिंकलाच; जिद्द आणि संघर्ष म्हणजे समाधान आवताडे!

ठाकरे घराण्यातील पहिला आमदार; शिवसेनेतील तेजस्वी युवापर्व; जाणून घ्या, आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवास!

(who is manikrao kokate, read about his political journey)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI