Gautam Gambhir: केकेआरच्या विजयानंतर गौतम गंभीरची पहिली पोस्ट, नक्की काय म्हणाला?

Gautam Gambhir : गौतम गंभीर याने या हंगामात केकेआरच्या मेंटॉरपदाची जबाबदारी स्वीकारली. केकआर यासह 10 वर्षांनी आयपीएल चॅम्पियन ठरली. केकेआरची 10 वर्षांची प्रतिक्षा संपल्यानंतर गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Gautam Gambhir: केकेआरच्या विजयानंतर गौतम गंभीरची पहिली पोस्ट, नक्की काय म्हणाला?
kkr gautam gambhir
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: May 27, 2024 | 3:25 AM

कोलकाता नाईट रायडर्सने 2012 साली पहिल्यांदा गौतम गंभीर याच्या नेतृत्वात चेपॉक स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. त्यानंतर पुन्हा 2014 साली गंभीरच्या कॅप्टन्सीत केकेआर विजेता ठरली. त्यानंतर तब्बल 10 वर्ष अर्थात एका दशकाच्या प्रतिक्षेनंतर अखेर केकेआर विजयी ठरली. या विजयातही गौतम गंभीरचं विशेष योगदान राहिलं. गंभीर यंदा केकेआरचा मेंटॉर म्हणून परतला आणि केकेआरला विजयी केलं. केकेआरच्या या विजयानंतर गंभीरने 2 वाक्यांची एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. गंभीरने या पोस्टमधून खूप काही सांगायचा प्रयत्न केला आहे.

सामन्याचा धावता आढावा

सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र हैदराबादची बॅटिंग फ्लॉप ठरली. केकेआरच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादच्या फलंदाजांची हवा निघाली. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये पावर प्लेच्या षटकात जितक्या धावा करायचे, तितक्या धावाही हैदराबादला पूर्ण डावात करता आल्या नाहीत. हैदराबादचा डाव 18.3 ओव्हरमध्ये 113 धावांवर आटोपला. केकेआरने विजयासाठी मिळालेलं. आव्हान हे 11 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. केकेआरने हा सामना 2 विकेट्स गमावून 8 विकेट्सने जिंकला. वेंकटेश अय्यर याने नाबाद अर्धशतकी खेळी केली.

गौतम गंभीरची सोशल मीडिया पोस्ट

दरम्यान केकेआरच्या विजयानंतर गौतम गंभीर याने रात्री उशिराने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 1 वाक्याची पोस्ट केली आहे. गंभीरने “जिसकी मति और गति सत्य की हो, उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते हैं”, असं म्हटलं आहे. आता गंभीरला या वाक्यातून नक्की काय म्हणायचंय? गंभीरने ही पोस्ट कुणासाठी टाकली आहे? अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

गंभीरची ‘एक्स’ पोस्ट

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन: श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: पॅट कमिन्स (कॅर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.