India vs Pakistan | विश्वचषकातील विजयाची परंपरा कायम, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

वर्ल्ड कपमध्ये संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात; भारताने आपली विजयी परंपरा कायम ठेवली. विराट कोहलीच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला.

  • Updated On - 12:12 am, Mon, 17 June 19 Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
India vs Pakistan | विश्वचषकातील विजयाची परंपरा कायम, भारताचा पाकिस्तानवर  दणदणीत विजय

India vs Pakistan मँचेस्टर (इंग्लंड) : वर्ल्ड कपमध्ये संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात; भारताने आपली विजयी परंपरा कायम ठेवली. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने वर्ल्डकपमध्ये आपणच बाप असल्याचं दाखवून दिलं.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात; पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. रोहित शर्माच्या खणखणीत 140 धावा; के. एल. राहुलच्या 57; कर्णधार कोहलीच्या 77 धावांच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 बाद 336 धावा केल्या. भारताचे मोठे आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना पावसामुळे दोन वेळा पवेलियनमध्ये परतावे लागले. अखेर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला सुधारित 40 षटकात 302 धावांचे आव्हान मिळाले. ते आव्हनही पाकला पेलवले नाही आणि पाकिस्तान 40 षटकांमध्ये केवळ 212 धावा करु शकला.

भारताकडून रोहित शर्माने 113 चेंडूत शानदार 140 धावांची आक्रमक खेळी केली. यात त्याच्या 14 चौकारांचा आणि 3 षटकारांचा समावेश आहे. रोहितला दुसऱ्या बाजूने के. एल. राहुलने साथ दिली. राहुलने 57 धावांची संयमी खेळी केली. विराट कोहलीने देखील 65 चेंडूत दमदार 77 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद आमीरने 3 विकेट घेतल्या.

भारताने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना हरवून झोकात सुरुवात केली होती. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला होता. त्यानंतर आता भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुळ चारली आहे. दुसरीकडे पाकिस्तानने विश्वचषकात 5 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला. त्यांचा एक सामना रद्द झाला होता.

LIVE UPDATE 

[svt-event title=”भारत-पाक सामना पुन्हा सुरु, DLS नुसार पाकिस्तानसमोर 40 षटकात 302 धावांचे लक्ष्य” date=”16/06/2019,11:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारत-पाक सामन्यात पुन्हा एकदा पावसाचा व्यत्यय, पाकिस्तानच्या 6 बाद 165 धावा” date=”16/06/2019,10:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाकिस्तानचे भारतासमोर लोटांगण, 6 बाद 165 धावा” date=”16/06/2019,10:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताची सामन्यावर मजबूत पकड, पाकिस्तान 5 बाद 129″ date=”16/06/2019,10:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाकिस्तानला तिसरा झटका, 25 षटकांमध्ये 126 धावा” date=”16/06/2019,9:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाकिस्तानला दुसरा झटका, 24 षटकांमध्ये 117 धावा” date=”16/06/2019,9:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाकिस्तानच्या 20 षटकांमध्ये 1 बाद 93 धावा” date=”16/06/2019,9:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाकिस्तानच्या 10 षटकांमध्ये 1 बाद 39 धावा” date=”16/06/2019,8:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाकिस्तानला पहिला झटका, 4 षटकांमध्ये 1 बाद 13 धावा” date=”16/06/2019,8:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताचं पाकिस्तानसमोर 337 धावांचे तगडं आव्हान” date=”16/06/2019,7:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला पाचवा झटका, विराट कोहली 77 धावांवर बाद” date=”16/06/2019,7:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावसाच्या व्यत्ययानंतर भारत-पाक सामना पुन्हा सुरु, भारत 4 बाद 305 धावा” date=”16/06/2019,7:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारत-पाकिस्तान रोमांचक सामन्यात पावसाचा व्यत्यय, भारताच्या 46 षटकांमध्ये 305 धावा” date=”16/06/2019,6:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विराट कोहलीचा नवा विक्रम, एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान 11 हजार धावा” date=”16/06/2019,6:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला तिसरा झटका, हार्दिक पांड्या 26 धावांवर बाद” date=”16/06/2019,6:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विराट कोहलीचे अर्धशतक, भारताच्या 43 षटकांमध्ये 276 धावा” date=”16/06/2019,5:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मा 113 चेंडूत 140 धावा करुन बाद” date=”16/06/2019,5:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताच्या 37 षटकांमध्ये 1 बाद 220 धावा” date=”16/06/2019,5:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रोहित शर्माचे 85 चेंडूत दमदार शतक, भारताच्या 1 बाद 172 धावा” date=”16/06/2019,5:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला पहिला झटका, के.एल.राहुल 57 धावांवर बाद” date=”16/06/2019,4:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”20 षटकांत भारताच्या नाबाद 105 धावा, रोहित शर्मा (63), के.एल.राहुल (39)” date=”16/06/2019,4:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रोहित शर्मा आणि के.एल. राहुलच्या सलामीवीर जोडीच्या 100 धावा पूर्ण” date=”16/06/2019,4:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”17.3 षटकांत भारताच्या 100 धावा पूर्ण” date=”16/06/2019,4:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”15 षटकांत भारताच्या नाबाद 87 धावा, रोहित शर्मा (53), के.एल.राहुल (32)” date=”16/06/2019,4:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”2 षटकार, 6 चौकारांसह रोहित शर्माचे अर्धशतक पूर्ण” date=”16/06/2019,3:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रोहित शर्माचा दुसरा षटकार, 12 षटकांत भारताच्या 75 धावा” date=”16/06/2019,3:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रोहितच्या चौकारासह भारताच्या 50 धावांची खेळी पूर्ण” date=”16/06/2019,3:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”10 षटकांत भारताच्या 53 धावा, रोहित शर्मा (37), के.एल.राहुल (14)” date=”16/06/2019,3:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रोहित शर्माचा आणखी एक चौकार, 8 षटकांत भारताच्या 42 धावा” date=”16/06/2019,3:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रोहित शर्माचा पहिला षटकार, 6 षटकांत भारताच्या 32 धावा” date=”16/06/2019,3:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” रोहित शर्माचा आणखी एक चौकार, 18 चेंडूत 19 धावा ” date=”16/06/2019,3:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”3 चौकारासह 5 षटकांत भारताच्या 20 धावा” date=”16/06/2019,3:22PM” class=”svt-cd-green” ] 3 चौकारासह 5 षटकांत भारताच्या 20 धावा, रोहित शर्मा (14) आणि के.एल राहुल (6) धावा

[/svt-event]

[svt-event title=” रोहित शर्माचा पहिला चौकार, 2 षटकांत भारताच्या 9 धावा” date=”16/06/2019,3:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि के.एल.राहुल मैदानात” date=”16/06/2019,3:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याला सुरुवात” date=”16/06/2019,3:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाकिस्तान विरुद्धचा भारतीय संघ ” date=”16/06/2019,2:40PM” class=”svt-cd-green” ] रोहित शर्मा, के.एल. राहुल, कर्णधार विराट कोहली, विजय शंकर, केदार जाधव, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह [/svt-event]

[svt-event title=” के.एल.राहुल सलामीवीर, चौथ्या क्रमांकावर विजय शंकर खेळणार” date=”16/06/2019,2:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय” date=”16/06/2019,2:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुपारी 2.30 वाजता नाणेफेक होणार, 3 वाजता सामन्याला सुरुवात” date=”16/06/2019,2:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Published On - 1:45 pm, Sun, 16 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI