तुमचा फोन चार्ज करताना तुम्ही देखील या गोष्टी करता? मग मोबाईल फुटू शकतो
फोन चार्ज करताना अनेकजण त्याच चुका करतात ज्यामुळे फोनचे प्रचंड नुकसान होऊ शकते. एवढंच नाही तर अनेकदा फोन फुटण्याची देखील शक्यता असते. फोन हाताळण्याबाबतच्या काही सवयी मोबाईल बॅटरीसाठी धोकादायक ठरू शकतात त्यामुळे स्फोटाचा धोकाही वाढतो. त्यामुळे कोणत्या चुका टाळणे गरजेचे आहे हे जाणून घेऊयात.

जवळपास सर्वांनाच रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असते. अनेकदा फोनची बॅटरी 100% होऊन जाते तरी देखील तो फोन सकाळपर्यंत तसाच चार्जिंगला असतो. पण तुम्हाला माहित आहे का की ही सवय फार धोकादायक ठरू शकते. यामुळे मोबाईल फुटूही शकतो. पण यामागे तशी बरीच कारणे आहेत ज्याबद्दल अनेकांना कल्पनाही नसेल.
रात्रभर फोन प्लग इन करणे
स्मार्टफोन चार्जिंगबद्दल अनेक गैरसमज आहेत. जसे की रात्रभर फोन प्लग इन करून झोपणे, तो 0% पर्यंत ड्रेन होऊ देणे किंवा वारंवार तो 100% पर्यंत चार्ज करणे. पण फोन चार्जिंगच्या या सवयी, वरवर सामान्य वाटत असल्या तरी, डिव्हाइसच्या बॅटरीसाठी तितक्याच हानिकारक असू शकतात. याबद्दल अनेक गोष्टी आहेत ज्या जाणून घेणे फार महत्त्वाच्या आहेत.
बहुतेक आधुनिक स्मार्टफोनच्या बॅटरी लिथियम-आयन असतात. वैज्ञानिकदृष्ट्या, लिथियम-आयन बॅटरी पूर्णपणे काढून टाकणे किंवा ती वारंवार पूर्णपणे चार्ज करणे धोकादायक ठरू शकते.
बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज केल्याने, म्हणजेच ती 0% पर्यंत कमी केल्याने, तिचे आयुष्य कमी होते. म्हणून, कमी चार्जिंग सायकल करणे चांगले. बरेच लोक त्यांच्या फोनची बॅटरी पूर्णपणे संपेपर्यंत वाट पाहतात.
बॅटरीवर ताण येऊ शकतो
100% पर्यंत चार्ज केल्याने बॅटरीचे नुकसान होते असे अनेकदा म्हटले जाते. काही प्रयोगांमधून असे दिसून आले आहे की बॅटरी वारंवार हाय व्होल्टेज स्थितीत ठेवल्याने, म्हणजेच जास्त काळ 100% वर ठेवल्याने दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. तर कधीकधी स्फोटही होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो फोनची बॅटरी ही 80% पर्यंत चार्ज ठेवण्याचा प्रयत्न करा.
बॅटरी फुटण्याची शक्यता असते
कधीकधी फोनच्या ओरिज्नल चार्जींगऐवजी दुसऱ्या एखाद्या फास्ट चार्जरचा उपयोग करणे काहींना सोयीचे वाटते कारण त्यामुळे फोन लवकरात लवकर चार्ज होतो. त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. बॅटरीवर ताण येऊन ती खराबही होऊ शकते.
आता सर्वात सामान्य आणि धोकादायक चूक म्हणजे फोन जास्त गरम होणे. सतत गेम खेळताना किंवा व्हिडिओ पाहत असाल किंवा चार्जिंग सुरु असताना तुम्ही फोन वापरत असाल तर फोन जास्त गरम होऊ शकतो कधीकधी काही परिस्थितीत बॅटरी फुटण्याची शक्यता असते. चार्जिंग करताना तुमचा फोन थोड्या थंड अन् मोकळ्या जागेत ठेवा.
बरेच लोक करत असलेली आणखी एक चूक म्हणजे बनावट किंवा स्थानिक चार्जर वापरणे. हे चार्जर व्होल्टेज योग्यरित्या नियंत्रित करत नाहीत किंवा त्यांना सेफ्टी सर्किट्स नसतात. यामुळे फोनची बॅटरी खराब होऊ शकते आणि इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटचा धोका वाढू शकतो.तुम्हाला जर तुमचा फोन दिर्घकाळ नीट चालावा असं वाटत असेल तर नक्कीच या चूका नक्की टाळा.
