Video : नवरदेवाचा मित्राच्या खांद्यावर बसून डान्स, पुढे काय झालं तुम्हीच पाहा!

सोशल मीडियावर हजारो-लाखो मनोरंजनात्मक व्हिडीओ समोर येत असतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा मजेदार व्हिडीओ एका लग्नामधील आहे

Video : नवरदेवाचा मित्राच्या खांद्यावर बसून डान्स, पुढे काय झालं तुम्हीच पाहा!
नवरदेवाचा डान्स व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर हजारो-लाखो मनोरंजनात्मक व्हिडीओ समोर येत असतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा मजेदार व्हिडीओ एका लग्नामधील आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर पोटदुखेपर्यंत तुम्ही हसाल मात्र, आश्चर्य देखील वाटेल. विशेष म्हणजे हा व्हिडीओ प्रत्येकाला हसवतोय. या व्हिडीओत तशी खास बात आहेच. चला तर बघूयात या व्हिडीओमध्ये असे काय खास आहे. (Groom Sit on Friend Shoulder Dance marriage Event Video Goes Viral on Social Media)

एका लग्नाची वरात जात आहे. त्यामध्ये वरातीमध्ये मुली, महिला, तरूण असे सर्वचजण आनंदात नाचताना दिसत आहेत. त्याचदरम्यान एक तरूण नवरदेवाला आपल्या खांद्यावर घेतो आणि आनंदात नाचत असतो. मग काय…नवरदेवाचाही आनंद गगणात मावेनासा होतो आणि नवरदेवही नाचण्यास सुरूवात करतो आणि तिथेच घोळ होतो..नाचताना नवरदेव आणि तो तरूण जमिनीवर पडतात आणि एकच गोंधळ उडतो.

मात्र, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाला आहे. विशेष म्हणजे तुम्ही स्वभावाने कितीही गंभीर राहा. पण हा व्हिडीओ बघितला तर तुमच्यावर आपणहून हास्य येईल. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून official_niranjanm87 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून त्यावर खूप मजेदार कमेंट्स करण्यात येत आहेत.

मध्यंतरी सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये लग्न सोहळ्यात अनेक लोक जमलेले होते. मंडपात नवरदेव आपले मित्र तसेच नातेवाईक यांच्यासोबत बसला होता. नवरेदवाचा शाही थाट पाहण्यासारखा होता. मात्र, त्यावेळी तो नवरदेव शांत बसलेला नव्हता तर भर मंडपात तो नवरदेव थेट तंबाखू चोळत होता आणि खात होता. तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या : 

Viral | लग्नाची मागणी घालण्यासाठी वापरली ‘ही’ खास ट्रिक, तरुणीचाही लगेच होकार, फोटो व्हायरल

Video | पाण्यात व्यायाम करण्याचा महिलेकडून प्रयत्न, पण ऐनवेळी भलतंच घडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | इकडे पतीने पत्नीला मिठीत घेतलं, तिकडे कुत्रा रुसला, पाहा व्हायरल व्हिडीओ

(Groom Sit on Friend Shoulder Dance marriage Event Video Goes Viral on Social Media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI