Bachchu Kadu Video : ‘जबाबदार महिलेने असं बोलणं म्हणजे…’, बच्चू कडूंची चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर नाराजी
अनिल परबांवर टीका करताना चित्रा वाघ या चांगल्याच भडकल्या असताना त्यांनी अनिल परबांवर सडकून टीका केली. यावरूनच बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली.
जबाबदार महिलेने असं बोलंणं चांगली गोष्ट नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. चित्रा वाघ यांनी काल केलेल्या विधानपरिषदेतील वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना असं वक्तव्य केलं आहे. ‘तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते’, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना उत्तर देताना म्हटलं होतं. दरम्यान, या वक्तव्यानंतर विरोधक खोचक टीका करत चित्रा वाघ यांना घेरताना दिसताय. ‘जबाबदार महिलेने असं बोलणं चांगली गोष्ट नाही. हेच जर अनिल परब यांनी म्हटलं असतं तर गोंधळ झाला असता ना…’, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. पुढे ते असेही म्हणाले, एका महिलेने असं बोलणं की, तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते म्हणजे एका जबाबदार महिलेने विधानपरिषदेत असं म्हणणं ही काही फार चांगली गोष्ट नाही, असं म्हणत बच्चू कडू यांनी चित्रा वाघ यांच्या वक्तव्यनंतर नाराजी व्यक्त केली. तर रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर खोचक टीका करता ट्वीटवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधताना ‘बाईईईईई काय हा प्रकार… थोडं थोडं साम्याच आहे, नाही ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!!’, असं म्हटलं होतं.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

