Pravin Darekar : कोल्हेकुई करणाऱ्या विरोधी पक्षाला निवडणूक निकालानं चपराक, प्रवीण दरेकर नेमंक काय म्हणाले?
'जनतेचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास... सर्व निकाल लागल्यानंतर साधारण ६० ते ७० टक्के विजय हा भाजप आणि महायुतीच्या बाजूने असणार', भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया
मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३ | आतापर्यंत ४६८ ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून १२४ ठिकाणी सध्या पुढे आहे. या महायुतीतील घटक अजित पवार गट, शिंदे गट हे भाजपच्या खालोखाल आहेत. त्यामुळे मविआच्या तिप्पट यश भाजपला मिळाले आहे. कोल्हेकुई करणारा विरोधी पक्षाकडून राज्यात जे वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. त्याला या निकालाद्वारे चपराक मिळाल्याचे मत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. तर जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे जनतेचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. इतकंच नाहीतर राज्याचा विकास हा केवळ महायुती, भाजप हा पक्षच करू शकेल, या उद्देशाने ग्रामपंचायती निवडणुकीच्या निकालात भाजपाला दैदीप्यमान यश मिळतंय, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे तर आता सुरूवात असल्याचे म्हणत सर्व निकाल लागल्यानंतर साधारण ६० ते ७० टक्के विजय हा भाजप आणि महायुतीच्या बाजूने असणार आहे, असा विश्वासही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.





