उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला, G20 प्रशासन हजर असतं, मात्र, सुनिल केदार यांची टीका

| Updated on: Mar 20, 2023 | 1:17 PM

काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी पंचनामे करायला सरकारी कर्मचारी अधिकारी उपलब्ध नसल्याने सरकारला धारेवर धरले

Follow us on

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. आज अधिवेशनात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी पंचनामे करायला सरकारी कर्मचारी अधिकारी उपलब्ध नसल्याने सरकारला धारेवर धरले. तसेच यावेळी त्यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय कार्यक्रम घेतात तेव्हा सर्व सरकारी कर्मचारी हजर असतात. मात्र शेतकऱ्यांचे पंचनामे करायला कर्मचारी नाहीत. हे दुर्दैवी असल्याचे म्हणत सरकारचा निषेध केला आहे.

यावेळी केदार यांनी G20 कार्यक्रम नागपूर मध्ये होत आहे. तेथे सरकारी कर्मचारी हजर आहेत. एकट्या महानगरपालिकेचे दोनशे कोटी रुपयांचा निधी वापरला जात आहे. तेथे सरकारी कर्मचारी हजर असतात. मात्र पंचनामे करायला ते नाहीत. हे दुर्भाग्याचं असल्याची टीका केली आहे.