मोदी लक्षद्वीपमध्ये गेले अन् तिकडे… मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे असंही कौतुक, बघा शिंदेंचं UNCUT भाषण
आज मोदींच्या हस्ते नाशिक येथे राष्ट्रीय युवा मोहत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आहे, यापूर्वी नाशिकच्या तपोवण येथे मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई, 12 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, यादरम्यान आज मोदींच्या हस्ते नाशिक येथे राष्ट्रीय युवा मोहत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आहे, यापूर्वी नाशिकच्या तपोवण येथे मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान नाशिकमधील काळाराम मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवातही त्यांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचं व्यासपीठावरच उपस्थित असताना कौतुकाचा वर्षाव केला. तसेच यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या मालदीव वादावर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. मोदी लक्षद्वीपमध्ये काय गेले, तिकडे मालदीवमध्ये भूंकप आला. त्यामुळे आपल्या देशाकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत कुणीच करू शकत नाही. हे फक्त आपल्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळेच होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
