कोल्हापूरात पावसाची जोरदार हजेरी

कोल्हापूरात पावसाची जोरदार हजेरी

| Updated on: Jun 03, 2022 | 9:19 AM

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपुर्व पाऊस जोरदार सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

कोल्हापूर – गुरूवारी कोल्हापूरात झालेल्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. तर अनेक ठिकाणी झाडे गाड्यांवरती पडल्याने गाड्यांचे नुकसान झाल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहेत. कोल्हापूरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच लाईट देखील अनेक भागात गेली होती. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर वाहतूकीतले अडथळे दूर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपुर्व पाऊस जोरदार सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Published on: Jun 03, 2022 09:19 AM