Special Report | अहमदनगमध्ये कोरोनाची तिसरी लाट?

नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 77 हजार 929 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 8881 जण हे 18 पेक्षा कमी वयाची बालकं आहेत. एकाच महिन्यात 8881 मुलांना कोरोनाची बाधा झाल्याने अहमदनगरमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलं बाधित होत असताना आता तिसरी लाट (Third Wave of Corona) आली आहे की काय असा प्रश्न आहे. कारण अहमदनगरमध्ये तब्बल 8881 मुलांना कोरोनाची (Ahmednagar third wave) बाधा झाली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 77 हजार 929 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 8881 जण हे 18 पेक्षा कमी वयाची बालकं आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबतची माहिती दिली.

लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. मे महिन्यात नगर जिल्ह्यातील लहान वयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8881 इतकी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. याबरोबरच जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

व्हिडीओ पाहा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI