Nagpur Crime | नागपूरच्या रस्त्यावर शस्त्र घेऊन हंगामा करणारे 12 जण अटकेत

नागपूर शहरातील गुन्हेगार पोलिसांना जुमानत नासल्याच पुन्हा एकदा उघड झाल आहे. शांती नगर परिसरात रात्री 8 च्या सुमारास 10 ते 15 युवक हातात लाठ्याकाठ्या तलवारी घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याची दृश्य CCTV मध्ये कैद झाली आहेत.

नागपूर शहरातील गुन्हेगार पोलिसांना जुमानत नासल्याच पुन्हा एकदा उघड झाल आहे. शांती नगर परिसरात रात्री 8 च्या सुमारास 10 ते 15 युवक हातात लाठ्याकाठ्या तलवारी घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याची दृश्य CCTV मध्ये कैद झाली आहेत. शांतीनगर परिसरातील दहीबाजार, भीम चौक इत्यादी परिसरातून हे युवक भरधाव वेगाने दुचाकीवरुन फिरून दहशत माजवत होते. मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली परिसरात कोणाच्या तरी हत्येचा प्लॅन या टोळीने केला होता, मात्र वाटेत पोलीस दिसल्याने टोळी सैरभैर झाली. पोलिसांना यांची माहिती मिळताच ते सतर्क होऊन ऍक्शन मोडवर आले. शहरात सांचारबंदीचे नियम लागू असल्याने संध्याकाळच्या वेळी चौकाचौकात पोलीस तैनात असताना 10 ते 15 युवक शस्त्रासह एकत्रित येऊन दीड तास दहशत माजवतात आणि पोलिसांना याचा सुगावा देखील लागत नाही यावरून पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो (Nagpur Police Arrested 12 from murder gang).

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI