AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atal Setu Bridge Mumbai : भर समुद्रातून रायगडला पोहोचा, सागरी सेतू खुला; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

Atal Setu Bridge Mumbai : भर समुद्रातून रायगडला पोहोचा, सागरी सेतू खुला; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

| Updated on: Jan 12, 2024 | 4:36 PM
Share

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण... 18,000 कोटी रुपये खर्च करून हा सागरी सेतू बांधण्यात आला आहे. हा सागरी सेतू मुंबईच्या शिवडीतून सुरू होऊन रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा शेवा येथे संपणार

मुंबई, 12 जानेवारी 2024 : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. 18,000 कोटी रुपये खर्च करून हा सागरी सेतू बांधण्यात आला आहे. हा सागरी सेतू मुंबईच्या शिवडीतून सुरू होऊन रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा शेवा येथे संपणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू हा एक सहापदरी सागरी सेतू आहे. याचा 16. 50 किलोमीटरचा भाग समुद्रावर आणि 5.5 किलोमीटरचा भाग जमिनीवर आहे. या सागरी सेतूमुळे अवघ्या 20 मिनिटात मुंबईतून नवी मुंबईत पोहोचता येणार आहे. दुसऱ्या मार्गाने मुंबईतून नवी मुंबईला गेल्यास दोन तास लागतात. पण या मार्गावरून गेल्यावर एक तास 20 मिनिटे वाचणार आहेत.

सर्वात मोठ्या अटल सेतूची वैशिष्ट्ये काय

  • मुंबईहून नवी मुंबईत अवघ्या 20 मिनिटांत पोहोचणे शक्य
  • समुद्रावर बांधलेल्या अटल पुलाची एकूण लांबी 22 किलोमीटर
  • 21.8 किमी लांबीच्या पुलांपैकी 16.5 किमी पाण्यावर
  • मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा 5.5 किमी जमिनीवर
  • या पुलावरून दररोज 70 हजार वाहने ये-जा करतील असा अंदाज
  • या पुलावरून प्रवास करण्यासाठी एकूण 375 रुपये टोल लागणार
  • एका साईडसाठी 250 रुपये टोल निश्चित
Published on: Jan 12, 2024 04:36 PM