AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangali | एकाच झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन, सांगलीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Sangali | एकाच झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन, सांगलीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 9:28 AM
Share

काकासाहेब दरवर्षी आपल्या नर्सरीत केशर आंब्याची रोपे लावतात. प्रत्येक रोप 40 ते 70 रुपयांना विकले जाते. सावंत दरवर्षी जवळपास 2 लाख आंब्याची रोपे विकतात. (Sangli Farmer successful story)

सांगली : सांगलीत एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन घेतल्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सांगलीतील जत तालुक्यातील अंतराळ गावातील एका शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. काकासाहेब सावंत असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांना यात चांगलाच आर्थिक फायदा झाला आहे.

काकासाहेब दरवर्षी आपल्या नर्सरीत केशर आंब्याची रोपे लावतात. प्रत्येक रोप 40 ते 70 रुपयांना विकले जाते. सावंत दरवर्षी जवळपास 2 लाख आंब्याची रोपे विकतात. यंदा मात्र त्यांना 4 लाख रोपांची ऑर्डर मिळाली आहे. मेकॅनिकची छोटीशी नोकरी करण्यापेक्षा स्वत:च व्यवसाय सुरू करा. त्यातून मोठे यश कमावता येते, यामुळे काकासाहेब सावंत यांच्या यशाची कहाणी अनेकांना प्रेरणा देऊ शकते. (Sangli Farmer successful of producing 22 varieties of mangoes on a single tree)