सोड रे, कोणय किरीट सोमय्या ?  संजय राऊत भडकले

सोड रे, कोणय किरीट सोमय्या ? संजय राऊत भडकले

| Updated on: Feb 16, 2022 | 11:17 AM

किरीट सोमय्यानं (Kirit Somaiya ) शेकडो कोटी रुपये गोळा केले आहेत. त्यातील किती टक्के ईडीकडे गेले आहेत ते बाहेर सांगत असतो, असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई: किरीट सोमय्यानं (Kirit Somaiya ) शेकडो कोटी रुपये गोळा केले आहेत. त्यातील किती टक्के ईडीकडे गेले आहेत ते बाहेर सांगत असतो, असं संजय राऊत म्हणाले. 8 जेवीपीडी येथील सुजित नवाब हा प्लॉट आहे. किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई यांनी धमकी देत 100 कोटी रुपयांची जमीन मातीमोल किमतीला घेतली. ईडीची (ED)धमकी देऊन किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई यांनी नावावर करुन घेतला. 110 कोटी रुपयाचा प्लॉट किरीट सोमय्यानं मातीमोल किमतीला घेतला. त्यासंदर्भात लवकरच पुरावे घेऊन येईन. किरीट सोमय्यांनी त्यातील 15 कोटी रुपये ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला नेऊन दिले हे सागांव, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. पत्रकारांनी पुरावे मागितले तर त्यावर किरीट सोमय्या कोण आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. त्यामुळं संजय राऊत यांच्याकडे पुरावे आहेत की नाहीत यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Published on: Feb 16, 2022 11:13 AM