प्रहारमधून ‘प्र’ निघून गेलाय, त्यामुळे राणेंनी मुखपत्राचं नाव ‘हार’ ठेवावं; निलम गोऱ्हेंची टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद काही शमण्याची चिन्ह नाहीत. ‘प्रहार’ मधून नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. नारायण राणेंच्या या टीकेला आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद काही शमण्याची चिन्ह नाहीत. ‘प्रहार’ मधून नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर  जोरदार हल्लाबोल केलाय. नारायण राणेंच्या या टीकेला आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे कुठलाही तोटा होणार नसल्याचा दावाही गोऱ्हे यांनी केलाय, हार की प्रहार? प्रहार मधील प्र कधीच निघून गेलाय. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखपत्राचं नाव हार ठेवावं, असा खोचक टोलाही नीलम गोऱ्हे यांनी लगावलाय. त्याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे शुन्यही तोटा होणार नाही, असंही त्या म्हणाल्या. राणे यांनी समतोल राखून बोललं पाहिजे, असा इशाराही गोऱ्हे यांनी यावेळी दिलाय.

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI