सिंगल चार्जवर 800 किमी रेंज, 5G तंत्रज्ञानाने सुसज्ज इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात

| Updated on: Mar 30, 2021 | 7:07 AM

एमजी (MG) कंपनी त्यांच्या आगामी टू सीटर इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकारचे अनावरण करण्यास सज्ज आहे. (MG Cyberster ready to launch)

सिंगल चार्जवर 800 किमी रेंज, 5G तंत्रज्ञानाने सुसज्ज इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात
MG Cyberster
Follow us on

मुंबई : एमजी (MG) कंपनी त्यांच्या आगामी टू सीटर इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकारचे अनावरण करण्यास सज्ज आहे. या कारच्या ऑनलाइन लीक झालेल्या फोटोंमधून या इलेक्ट्रिक कारचे डिझाईन समोर आले आहे. या कारचा पुढील भाग थोडासा खालच्या बाजूला झुकलेला आहे, परंतु त्यामुळे या कारला स्पोर्टी लुक मिळाला आहे. त्याचबरोबर स्टाईलच्या बाबतीत या कारमध्ये बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. MG चा लोगो पुढच्या बाजूला असलेल्या लिप स्पॉयलरच्या मध्यभागी डिझाईन करण्यात आला आहे. (MG Cyberster EV with 800 kms range and 5G Connectivity, see pics)

Cyberster मध्ये मॅजिक आय इंटरअॅक्टिव्ह हेडलाइट्स देण्यात आल्या आहेत ज्या जबरदस्त दिसत आहेत. कारच्या बाजूला लेझर बेल्ट एलईडी स्ट्रिप आहे. वाहनाच्या मागील बाजूस Kammback स्टायलिंग आहे. वाहनात तुम्हाला उच्च कार्यक्षमतेची चाके (हाय परफॉर्मन्स व्हील) मिळतात, जी रोटेटिंग स्पोक्स आणि सेंटर लॉकिंग सिस्टिमसह येतात.

सिंगल चार्जवर 800 किमी धावणार

लीक झालेल्या फोटोंमधून या कारचा पूर्ण लुक पाहायला मिळाला नाही. कार निर्मात्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, MG Cyberster केवळ 3 सेकंदात 100 किमी वेगाने धावू शकते. या स्पोर्ट्सईव्ही बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ही कार पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर 800 कि.मी.पर्यंतची रेंज देते.

5 जी कनेक्टिव्हिटी

इंटेलिजेंट प्यूर इलेक्ट्रिक आर्किटेक्चरवर आधारित या वाहनात ग्राहकांना 5 जी कनेक्टिव्हिटी देखील मिळते. या व्यतिरिक्त ही पहिली कार असेल ज्यात गेमिंग कॉकपिंट देण्यात येईल. ही कार अनेक मार्गांनी इतर कार्सपेक्षा वेगळी असल्याने तरुणांना आकर्षित करेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

मार्केटमध्ये MG चा बोलबाला

एमजी कंपनीच्या गाड्यांना ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. जर तुम्हाला याक्षणी बाजारात एमजी हेक्टर आणि हेक्टर प्लस कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला बराच काळ थांबावं लागू शकतं. कारण या गाड्यांचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरीयड) 3 ते 5 आठवड्यांचा आहे.

1 रुपयांत 5 किलोमीटर धावणार, नवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

आयआयटी-दिल्लीच्या इनक्युबेटेड स्टार्टअप गॅलिओस मोबिलिटीने (Incubated Startup Galio Mobility) ‘होप’ नावाची इलेक्ट्रिक स्कूटर विकसित केली आहे, जी स्कूटर 20 पैशांमध्ये एक किलोमीटरपर्यंत धावेल. डिलिव्हरी आणि लोकल कम्यूटेशनसाठी ही एक किफायतशीर स्कूटर आहे. ही स्कूटर 25 किमी प्रति तास इतक्या स्पीडने धावू शकते. तसेच हे इलेक्ट्रिक वाहन सूट प्रकारात येते. ही स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नोंदणी करण्याचीदेखील आवश्यकता नाही.

‘होप’ (Hope Electric Ecooter) एका पोर्टेबल चार्जर आणि पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरीसह सज्ज आहे, जी बॅटरी घरात वापरल्या जाणार्‍या सामान्य प्लगद्वारे चार्ज केली जाऊ शकते. सामान्य प्लगद्वारे ही बॅटरी 4 तासात पूर्णपणे चार्ज केली जाते. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार दोन वेगवेगळ्या रेंजच्या बॅटरी निवडण्याची सुविधा आहे. ग्राहक 50 किमी रेंज असलेली अथवा 75 किमी रेंज असलेल्या बॅटरीची निवड करु शकतो.

आयआयटी-दिल्लीने दिलेल्या माहितीनुसार ही स्कूटर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, डेटा मॉनिटरिंग सिस्टम आणि पेडल असिस्ट युनिटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. यात IoT आहे जे डेटा अॅनालिटिक्सद्वारे ग्राहकांना त्यांच्या स्कूटरबद्दल नेहमी माहिती देते. अशा प्रकारच्या फीचर्समुळे, होपची भविष्यात स्मार्ट आणि कनेक्टेड स्कूटर्सच्या श्रेणीमध्ये गणना केली जाईल.

संबंधित बातम्या

बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace भारतात लाँच, किंमत फक्त…

Petrol ची टाकी फुल करण्याचं टेन्शन खल्लास, सिंगल चार्जमध्ये 60KM मायलेज देणारी इलेक्ट्रिक बाईक भेटीला

केवळ 50 मिनिटात फुल चार्ज, देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईकची रेकॉर्डब्रेक विक्री

(MG Cyberster EV with 800 kms range and 5G Connectivity, see pics)