AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! स्वतःच्या हाताने जेवण घ्यायला सांगितल्याचा राग, मुलाकडून आई-वडिलांना बेदम मारहाण

वडिल नामदेव यांनी मुलाला स्वतःच्या हाताने जेवायला घे असे सांगितले. यामुळे मुलगा अमितला राग आला. त्याने रागात आईला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पत्नीला मुलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी नामदेव हे मध्ये पडले.

धक्कादायक ! स्वतःच्या हाताने जेवण घ्यायला सांगितल्याचा राग, मुलाकडून आई-वडिलांना बेदम मारहाण
मुलाकडून आई-वडिलांना बेदम मारहाणImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 10:33 PM
Share

कल्याण : मुलाला हाताने जेवण घ्यायला सांगितले म्हणून संतापलेल्या माथेफिरु मुला (Son)ने आई-वडिलांना बेदम मारहाण (Beating to Parents) केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. अमित घोरकडे असे 28 वर्षीय माथेफिरु मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित वडिल नामदेव वगप्पा घोरकडे यांच्या तक्रारीवरुन आरोपी मुलाविरोधात टिळकनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक (Arrest) केले आहे.

पीडित नामदेव घोरकडे हे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात. कल्याणमधील कचोरे गावातील न्यू गोविंदवाडीमध्ये ते आपली पत्नी रंजना घोरकडे आणि मुलगा अमितसोबत राहतात. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अमित बाहेरुन घरी आला. त्याने आईकडे जोवायला मागितले.

हाताने जेवायला घे सांगितले म्हणून भडकला

वडिल नामदेव यांनी मुलाला स्वतःच्या हाताने जेवायला घे असे सांगितले. यामुळे मुलगा अमितला राग आला. त्याने रागात आईला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पत्नीला मुलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी नामदेव हे मध्ये पडले.

वडिल मध्ये पडल्याने अमित अधिकच भडकले. त्याने घराशेजारी असलेल्या कोंबड्या ठेवण्याच्या लोखंडी जाळीवरचा सिमेंटचा पत्रा वडिलांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात नामदेव हे जखमी झाले.

शेजाऱ्यांनी धाव घेत आई-वडिलांची सुटका केली

आई-वडिलांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले आणि माथेफिरु वडिलांच्या तावडीतून आई-वडिलांची सुटका केली. यानंतर जखमी आई-वडिलांनी टिळकनगर पोलिसात मुलाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तात्काळ फरार झालेल्या माथेफिरु मुलाला ताब्यात घेतले. पोलीस पुढील तपास करत आहेत. (In Kalyan the son abused and beat the parents for minor reasons)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.