चंद्रपूरमध्ये थरार! हत्या करुन स्कॉर्पिओतून पळाले, पण पापाचा घडा भरला होता

चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर इथं घडलेल्या निर्घृण हत्याकांडप्रकरणी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

चंद्रपूरमध्ये थरार! हत्या करुन स्कॉर्पिओतून पळाले, पण पापाचा घडा भरला होता
आरोपींना सिनेस्टाईल अटकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 11:05 AM

चंद्रपूर : दुर्गापूर येथील निर्घुण हत्याकांडातील 8 संशयीत आरोपीना अटक (Chandrapur Police Arrest) करण्यात आली. आहे. त्यामुळे या हत्याकांड प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता दहा वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) कारमधून पळून जात असताना मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्यात. वर्ध्याकडे (Wardha) स्कॉर्पिओ वाहनाने सर्व आरोपी पळून जात होते. त्यावेळी आरंभा टोल नाका येथे पोलिसांनी आरोपींच्या वाहनाला गाठलं आणि त्यांना अटक केली.

चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व वैमन्यस्यातून थरारक हत्याकांड घडलं होतं. एका टोळीने महेश मेश्राम या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाची हत्या केली होती.

महेश मेश्रामवर पाळत ठेवून मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. धारदार शस्त्रांनी वार करून भररस्त्यात महेश मेश्रामची हत्या करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक बाब म्हणजे महेश मेश्राम याचे शिर निर्दयपणे धडावेगळे केल्यानं एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळापासून अंदाजे 50 मिटर दूर महेश याचं शिर फेकून मारेकरी पळून गेले होते.

या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या हत्याप्रकरणी चार विशेष शोध पथके गठीत करण्यात आली होती.

या पथकांनी अज्ञात आरोपींची नावं आणि त्यांचा ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती प्राप्त करून तांत्रीक तपास केला. यातील संशयीत आरोपी वर्धा जिल्ह्यात स्कॉर्पिओ गाडीने पळून जात असल्याची माहिती मिळाली.

सदर वाहनाचा माग काढून पथकाने या स्कॉर्पिओला आरंभा टोल नाका, जिल्हा वर्धा येथे दोन वाहने आडवे लावून अडविले. त्यानंतर व योग्य ती काळजी घेवून शिताफीने वाहनामधील 8 संशयित आरोपींना अटक केली.

अटक केलेल्या आरोपींची नावे :

  • 1) अतुल मालाजी अलीवार (वय 22 वर्ष रा. समता नगर वार्ड क्र 6 दुर्गापूर)
  • 2) दिपक नरेद्र खोब्रागडे (वय 18 वर्ष रा. समता नगर वार्ड के 6 दुर्गापूर)
  • 3 ) सिध्दार्थ आदेश बन्सोड (वय 21 वर्ष रा नेरी दुर्गापूर)
  • 4) संदेश सुरेश चोखान्द्रे (वय 19 वर्ष रा सम्राट अशोक वार्ड के 2 दुर्गापूर)
  • 5) सुरज दिलीप शहारे वय (19 वर्ष रा. समता नगर वार्ड क्र 6 दुर्गापूर)
  • 6) साहेबराव उत्तम मलिये (वय 45 वर्ष रा नेरी समतानगर वार्ड क्र 6 दुर्गापूर)
  • 7) अजय नानाजी दुपारे (वय 24 वर्ष रा उर्जानगर कोडी दुर्गापूर)
  • 8) प्रमोद रामलाल सूर्यवंशी (वय 42 वर्ष, रा उर्जानगर दुर्गापूर)

गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांतच 8 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वरील आरोपी क्रमांक 1 ते 6 यांचा या हत्याकांड प्रकरणा प्रत्यक्ष सहभाग आहे. तर अन्य दोन आरोपींनी स्कॉर्पिओतून इतर आरोपींना पळून जाण्यास मदत केली असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.

याप्रकरणी सध्या दुर्गापूर पोलिसांकडून पुढील तपास केला जातो आहे. भररस्त्यात घडलेल्या या धक्कादायक हत्याकांड प्रकरणानंतर दुर्गापूरमध्ये खळबळ माजली होती. मात्र पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत अवघ्या काही तासांतच हत्येचा छडा लावलाय.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.