August 26, 2019 - TV9 Marathi

Nokia : या दोन फोनच्या किमतीत भरघोस कपात

नोकियाचा स्मार्टफोन घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. एचएमडी ग्लोबलने भारतात आपल्या दोन स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. यात Nokia 7.1 आणि Nokia 6.1 Plus चा समावेश आहे.

Read More »

तिरंगा फडकला, राष्ट्रगीत सुरु झालं, अभिमानाने ऊर भरुन सिंधूच्या डोळ्यात अश्रू तरळले

भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू (P V Sindhu) हिने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. सलग दोन अंतिम सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर अखेर सिंधूने तिचं ध्येय गाठलं आणि ती जगज्जेती ठरली.

Read More »

नेव्हीचा निधी 18 टक्क्यांहून 13 टक्के केला, नौदल प्रमुखांची जाहीर नाराजी

भारतीय नौदलाचे प्रमुख करमवीर सिंह (Karambir Singh) यांनी नौदलाच्या निधीतील कपातीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नौदलासाठीची सुरक्षा अर्थसंकल्पातील तरतूद 18 टक्क्यांवरुन 13 टक्क्यांवर आल्याचंही नौदल प्रमुखांनी नमूद केलं.

Read More »

RBI मोदी सरकारला 1.76 लाख कोटी रुपये देणार, मंदीवर मात होणार?

आरबीआयच्या संचालकीय मंडळाच्या बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर हे पाऊल (RBI Surplus Fund) उचलण्यात आलं. आरबीआयच्या कामकाजासाठीचं भांडवल आणि अधिशेष भांडवल याचं हस्तांतरण यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली होती.

Read More »

राम शिंदे निवडूनच येणार नाही, तर त्यांना मंत्री कसं करणार? : जयंत पाटील

भाजपचे नेते आणि जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे त्यांना मंत्री कसं करणार, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विचारला आहे. ते राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत जामखेड येथे बोलत होते.

Read More »

धनंजय मुंडे, पंकजाताई सोडा, तुम्हाला आमचे सुरेश धसच पुरेसे आहेत : मुख्यमंत्री

धनंजय मुंडे यांना चर्चेसाठी मी स्वतः, पंकजाताई किंवा खासदार प्रीतमताई यांची गरज नाही, त्यांना आमचे आमदार सुरेश धसच पुरेसे आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis Beed) धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. बीडमध्ये महाजनादेश यात्रेतील सभेत ते बोलत होते.

Read More »

माझ्यासोबतही दिग्दर्शकाकडून कास्टिंग काऊचचा प्रयत्न, विद्या बालनचा धक्कादायक खुलासा

प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी देणाऱ्या बॉलिवुडमधील अभिनेत्रींचं आयुष्य खूप सहज सोपं वाटतं. मात्र, बॉलिवूडच्या आत त्यांचाही एक संघर्ष सुरू असतो. त्याचाच भाग म्हणून मध्यंतरी ‘मी टू’ (MeToo) आंदोलनात अनेक खुलासे झाले. आता बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिनेही आपल्यासोबत घडलेला काहीसा असाच एक प्रसंग सांगितला आहे.

Read More »

इम्रान खानचा थयथयाट, भारताला अणुयुद्धाची धमकी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan addresses Pakistan) यांचा संयम सुटला आणि त्यांनी (Imran Khan addresses Pakistan) पुन्हा एकदा भारताला अणुयुद्धाची धमकी दिली. पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना इम्रान खानने स्वतःची कामगिरी सांगण्याचा प्रयत्न केला.

Read More »

शिखर बँक घोटाळा : अजित पवारांसह 70 जणांवर 420 चा गुन्हा

मुंबई उच्च न्यायालयाने पाच दिवसात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे या गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपात असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांचं नाव आहे.

Read More »

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ : चंद्रकांत पाटील

गणेशोत्सवानिमित्त मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 दरम्यान मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे.

Read More »