August 27, 2019 - TV9 Marathi

VIDEO पोस्ट करत माजी गृहराज्यमंत्र्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप, तक्रारीनंतर पीडित मुलगी गायब

भाजपचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद (Swami Chinmayanand) यांच्यावर एका 23 वर्षीय विद्यार्थीनीने लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित मुलीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिच्यावरील अत्याचाराची माहिती दिली. मात्र, ही मुलगी तक्रारीनंतर गायब झाली आहे.

Read More »

घर बसल्या हवामान पाहा आणि मगच शेतात जा, शेतकऱ्यांसाठी खास App

देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे शेतकऱ्यांना घर बसल्या हवामान आणि कृषी सल्ल्याची माहिती मिळणार आहे. हवामान विभाग आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्थेने मेघदूत हे ॲप विकसित केले आहे.

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावरुन भाजप कार्यकर्ते आणि अब्दुल सत्तार यांच्यात जुंपली

अब्दुल सत्तार (Sillod Abdul sattar) यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे, तर भाजप कार्यकर्त्यांनी या स्वागताला जोरदार विरोध केलाय. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अब्दुल सत्तार यांनी मंच उभारत सिल्लोड शहरभर फलक लावले आहेत.

Read More »

अमित शाह 1 सप्टेंबरला सोलापुरात, दिग्गज नेत्यांची मेगा भरती होणार?

यात्राप्रमुख आणि भाजपचे सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप 1 सप्टेंबर रोजी सोलापुरात अमित शाहांच्या (Amit Shah Solapur) उपस्थितीत होईल.

Read More »

मुख्यमंत्र्यांविरोधातील ईडी तक्रारीत तथ्य किती?

ईडीची भीती दाखवून सत्ताधारी भाजप पक्ष विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये येण्यास भाग पाडत आहे, असाही आरोप विरोधकांकडून होत आहे. मात्र, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातच ईडीमध्ये तक्रार दाखल झाली आहे.

Read More »

Harley Davidson ची भारतातली पहिली ई-बाईक, किंमत तब्बल…

ही बाईक फक्त 3 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रती तासाचा वेग धरु शकते, असा दावा कंपनीने केला आहे. तर 100 ते 129 किलोमीटरचा वेग पकडण्यासाठी ही बाईक फक्त 1.9 सेकंद घेईल, असेही कंपनीने सांगितले.

Read More »

सरकार कुणाचंही येऊ द्या, मंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीचेच होतील : सुप्रिया सुळे

भाजपच्या कार्यकर्त्यांचं वाईट वाटतं, त्यांनी संघर्ष केला आणि शेवटी मंत्री आमचेच होणार. मंत्री करतो म्हणूनच सर्वांना घेतलं जातंय, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read More »

पुढील 5 दिवसात राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र, हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी कमी-अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

Read More »

अमित शाहांचं विमान उडवण्यासाठी कारगील हिरोचा ‘फेक मेल’

वायूसेनेच्या एका माजी वैमानिकावर गृहमंत्री अमित शाहांचं विमान उडवण्यासाठी आपल्या ओळखीत बदल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दलाने (BSF) या वैमानिकाविरोधात चौकशी सुरू केली आहे.

Read More »

काश्मीर सोडा, मुजफ्फराबाद वाचवा, इम्रान खानला घरचा आहेर

पंतप्रधान मोदींनी काश्मीर हिसकावून घेतलं आणि आपले पंतप्रधान झोपेतच राहिले. अगोदर आपलं धोरण होतं की श्रीनगर कसं मिळवायचं. पण आता मुजफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) वाचवणंही कठीण झालंय, अशा शब्दात भुट्टो (Bilawal Bhutto Zardari) यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली.

Read More »