Aai Kuthe kay Karte | अखेर ‘अनिरुद्ध-संजना’च्या नात्याचे सत्य संपूर्ण देशमुख परिवारासमोर येणार!

आई-अप्पांपासून लपवलेले नाते आता अखेर संपूर्ण कुटुंबासमोर येणार आहे. या नात्याबरोबरच अनिरुद्धचा खोटा चेहराही आई-आप्पांसमोर उघड होणार आहे.

Aai Kuthe kay Karte | अखेर 'अनिरुद्ध-संजना'च्या नात्याचे सत्य संपूर्ण देशमुख परिवारासमोर येणार!
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 6:38 PM

मुंबई :आई कुठे काय करते’ (Aai Kuthe kay karte) ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. कुटुंबाला विश्व मानणाऱ्या आईला अर्थात अरुंधतीला आता सत्य परिस्थिती कळली आहे. अनिरुद्धचे संजनासोबत असणारे नाते उघड झाल्यानंतर आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. आई-अप्पांपासून लपवलेले नाते आता अखेर संपूर्ण कुटुंबासमोर येणार आहे. या नात्याबरोबरच अनिरुद्धचा खोटा चेहराही आई-आप्पांसमोर उघड होणार आहे.(Aai Kuthe kay Karte latest update sanjana and aniruddh caught by deshmukh family)

संजना व अनिरुध्दच्या नात्याविषयी समजल्यानंतर खचून न जाता पुन्हा उमेदीने उभे राहण्याचा ठाम निश्चय अरुंधतीने केला आहे. तिच्या या धाडसी निर्णयाला तिच्या जवळच्या माणसांचा ठाम पाठींबा आहे. यश, केदार, गौरी आणि विमल यांनी अरुंधतीला तिच्या या नव्या प्रवासात साथ देण्याचे ठरवले आहे.

अशी बदलली अरुंधतीची दिनचर्या

या सगळ्या प्रकारानंतर आता अरुंधतीने अनिरुद्धला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी केली आहे. अरुंधती रोज मॉर्निंग वॉकला जाते, गाडी शिकायलासुध्दा तिने सुरुवात केली आहे. तिच्यातला हा बदल आता हळूहळू घरात चांगलाच समजायला लागला आहे. त्यातच अनिरुध्द तिच्यावर कुरघोडी करण्याची कुठलीच संधी सोडत नाहीय. अरुंधती वागणे पटत नसल्याने संतापलेल्या आईलासुध्दा यासाठी त्याने हाताशी धरले आहे. पण घरातले  रोजचे हे वाद नेमके का सुरू आहेत, याचे उत्तर आता लवकरच घरातल्यांना मिळणार आहे. अनिरुद्धच्या या सत्याने आता पुन्हा एकदा देशमुख कुटुंब हादरुन जाणार आहे. (Aai Kuthe kay Karte latest update sanjana and aniruddh caught by deshmukh family)

अनिरुद्धचे पितळ उघडे पडणार…

अप्पांच्या आजारपणानंतर मोकळ्या वातावरणात फिरून यावे म्हणून देविकाने अरुंधतीला (Aai Kuthe kay Karte) छान ‘हॉलिडे पॅकेज’ भेट म्हणून दिले आहे. देविकाच्या या गिफ्टने घरातील सगळे लोक खुश झाले आहेत. सगळे कुटुंब लोणावळ्याला एका रिसॉर्टवर गेले आहे. नेमके याच ठिकाणी संजना आणि अनिरुद्ध सुद्धा खोटे बोलून आलेले आहेत.

अनिरुध्द हैद्राबादला ऑफिसच्या कामानिमित्त जातोय, असे घरी सांगून संजनासोबत रिसॉर्टवर मजा करण्यासाठी गेला आहे. तिथे स्टेजवर चक्क गुडघ्यावर बसून संजनाच्या बोटात अंगठी घालून तो तिच्यासमोर प्रेमाची कबुली देणार आहे. नेमके याचवेळी संपूर्ण देशमुख परिवार तिथे येऊन पोहोचणार आहे. यानंतर अरुंधती अनिरुध्दसमोर टाळ्या वाजवत त्याला सांगते, ‘तुम्हीच तुमच्या तोंडून सर्वांना खरे सांगून टाकलेत’. संजना व अनिरुध्दबद्दल इतके दिवस आई-अप्पांना काहीच माहित नव्हते. आत्ता ते त्यांनाही कळणार आहे. तेव्हा आता या मालिकेत काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी सगळेच प्रेक्षक उत्सुक आहेत.

(Aai Kuthe kay Karte latest update sanjana and aniruddh caught by deshmukh family)

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.