सलमान खान आणि रेखाची गळाभेट, सारा अली खान हिने केले दुर्लक्ष, दबंग खान आणि अभिनेत्रीमध्ये वाद?, अखेर…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे त्याने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. सध्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

सलमान खान आणि रेखाची गळाभेट, सारा अली खान हिने केले दुर्लक्ष, दबंग खान आणि अभिनेत्रीमध्ये वाद?, अखेर...
salman khan and sara ali khan
| Updated on: Sep 08, 2024 | 1:26 PM

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी अत्यंत भव्य अशा पद्धतीने गणपती बाप्पाचे स्वागत केले. अंबानीच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूड कलाकार हे मोठ्या संख्येने उपस्थिते होते. आता यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान हा जबरदस्त लूकमध्ये पोहोचला होता. यावेळी सर्वांना भेटताना सलमान खान दिसतोय. सलमान खान याला बघताच रेखा यांनी सलमान खानची गळाभेट घेतली. इतरही बॉलिवूड कलाकारांना भेटताना सलमान खान हा दिसला.

दुसरीकडे सैफ अली खान हा पत्नी करीना कपूर खान हिच्यासोबत जबरदस्त अशा लूकमध्ये पोहोचला. सारा अली खान ही भाऊ इब्राहिम अली खानसोबत पोहोचली. सारा अली खानच्या लूकची जोरदार चर्चा रंगत आहे. सारा आणि इब्राहिम यावेळी सर्वांना भेटताना दिसले. मात्र, यावेळी असे काही झाले की, ज्याची जोरदार चर्चा आता रंगताना दिसत आहे.

विशेष म्हणजे सलमान खान हा अनंत अंबानीसोबत देखील बराच वेळ बोलत उभा होता. दोघांमघ्ये खास मैत्री बघायला मिळाली. सलमान खान याच्याकडे पार्टीत दुर्लक्ष करताना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे दिसले. सलमान खान पाहुण्यांसोबत बोलत असताना त्याच्याजवळून जाताना दोघे दिसले. मात्र, सलमान खानला बोलणे टाळले.

आता याचेच काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सलमान खान आणि सारा अली खान यांच्यात काही वाद झाला का? हा प्रश्न देखील चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय, दुसरीकडे सैफ अली खान याने घातलेल्या कपड्यांची जोरदार चर्चा ही सुरू आहे. सलमान खान नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे.

सलमान खान हा लवकरच बिग बॉस सीजन 18 चा प्रोमो शूट करेल. सलमान खान याची तब्येत खराब असल्याने तो यंदाचे सीजन होस्ट करणार नसल्याचे सांगितले जाते होते. मात्र, आता हे स्पष्ट झाले की, सलमान खान हाच बिग बॉसच्या होस्ट करताना दिसणार आहे. सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.