मलायका-अरबाजचा लेक अरहान आणि सावत्र आई शूराच्या वयात किती वर्षांचे अंतर? दोघांमधील नाते कसे?
अरबाज खानचा मुलगा अरहान आणि त्याची सावत्र आई शूरा खान यांच्या वयातील अंतराची सध्या प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. . शूराने नुकत्याच एका मुलीला जन्म दिल्यानंतर अरहान तिला आणि बाळाला भेटायला रुग्णालयात गेला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर त्यांच्या वयातील अंतराची चर्चा होताना दिसत आहे.

अभिनेता अरबाज आणि त्याची पत्नी शूरा खान हे आता एका मुलीचे पालक झाले आहेत. शूराने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. या आनंदाच्या प्रसंगी खान कुटुंबातील सदस्य तिला भेटण्यासाठी, बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. एवढंच नाही तर अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान देखील रुग्णालयात त्याच्या सावत्र बहिणीला पाहायला गेला होता. पण त्यानंतर अरहान आणि त्याची सावत्र आई शूरा यांच्या वयाची चर्चा होत आहे. अरहान आणि शूरा यांच्यातील वयातील अंतर माहितीये का?
अरबाज दुसऱ्यांदा वडील झाला
अरबाज आणि मलायका यांचा मुलगा अरहान आहे. तर अरबाज आणि त्याची दुसरी पत्नी शूरा खान यांनी अलीकडेच एका मुलीचे स्वागत केले. अरबाज आता दुसऱ्यांदा वडील झाला आहे. अरबाज आणि शूरा खान यांचे लग्न देखील खूप चर्चेत आले होते. मलायकापासून घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजने 2023 मध्ये शूराशी लग्न केले. तेव्हा देखील या दोघांच्या वयातील अंतराबद्दल चर्चा झाली होती.
अरबाज त्याची पत्नी शूरापेक्षा 23 वर्षांनी मोठा
अरबाज शूरा आणि मलायका दोघांपेक्षाही मोठा आहे. अरबाज त्याची पत्नी शूरापेक्षा 23 वर्षांनी मोठा आहे. तर अरबाज आणि मलायकाच्या वयातही 7 वर्षांचा फरक आहे. आता अरबाज 58 वर्षांचा आहे तर मलायका 51 वर्षांची.
View this post on Instagram
शूरा आणि अरहानच्या वयातील अंतर किती?
शूरा अरबाजपेक्षा खूपच लहान आहे. त्यामुळे तिच्या आणि अरहानमधील वयाच्या फरकाबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. शूरा आता 35 वर्षांची आहे, तर अरबाजचा मुलगा अरहान 22 वर्षांचा आहे. म्हणजेच त्यांच्यात 13 वर्षांचे अंतर आहे. पण तरी देखील शूरा आणि अरहानमधील नातं हे अगदीच मैत्रीपूर्ण असल्याचं दिसून येतं.
शूरा खान आणि अरहानमध्ये चांगली मैत्री
जेव्हा अरबाजने शूराशी लग्न केले तेव्हा अरहान देखील त्यांच्या लग्नात सहभागी झाला होता. त्याचे त्याच्या सावत्र आईशी देखील तेवढेच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अनेक सणांमध्ये ते एकत्र दिसतात. एवढंच नाही तप शुराने अरहानच्या 22 व्या वाढदिवसादिवशी एक खास पोस्टही केली होती. जी बरीच चर्चेत आली होती. शुराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अरहानचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये अरहान गिटार वाजवताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर तिने लिहिलं होतं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा आणि माझं कुटुंब अरहान. तू जसा आहेस तसाच राहिल्याबद्दल धन्यवाद.’आणि तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर या दोघांमध्ये खूप चांगलं नातं असल्याचं स्पष्ट होतं.
